NDA 
Latest

NDA : छोट्या खेड्यातील सानिया मिर्झाची आकाशाला गवसणी, बनणार भारताची ‘पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट’

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : NDA : भारतातील एका छोट्याशा खेड्यातील एका टीव्ही मेकॅनिकची मुलगी सानिया मिर्झा भारताची पहिली मुस्लिम फायटर पायलट होण्यास सज्ज झाली आहे. तिने नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी परीक्षेत 149 वी रँक मिळवत आकाशाला गवसणी घातली आहे. तर एनडीएमधील महिलांसाठी राखीव असलेल्या 19 जागांमध्ये सानियाने दुसरे स्थान पटकावले आहे.

NDA : सानिया ही उत्तर प्रदेशच्या देहात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या जसोवर नावाच्या छोट्या गावातील एक टीव्ही मेकॅनिक शाहीद अली यांची ती मुलगी आहे. तीने तिच्या गावातील पंडित चिंतामणी दुबे इंटर कॉलेजमधून हायस्कूल पूर्ण केले. दहावीनंतर बारावी पूर्ण करण्यासाठी मिर्झापूर शहरातील गुरु नानक गर्लस् इंटर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एनडीएची परीक्षा क्रॅक करणारी सानिया ही जिल्ह्यातील यूपी बोर्डात बारावीतही टॉपर होती. एप्रिल 2022 मध्ये ती या प्रतिष्ठित एडीए परीक्षेला बसली आणि 149 व्या क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खडकवासला एनडीएमध्ये तिला ती 27 डिसेंबर 2022 ला सामील होणार आहे. जर इथून पुढचे सर्व प्रशिक्षण व्यवस्थित पार पडले तर सानिया मिर्झा भारतीय वायुसेनेतील पहिली मुस्लीम सेनानी ठरणार आहे.

NDA : आपल्या या यशाबद्दल बोलताना सानियाने एनआयला सांगितले, "मला फ्लाइट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदीकडून खूप प्रेरणा मिळाली. मी तिला पाहूनच एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. मला आशा आहे की तरुण पिढीला माझ्याकडून प्रेरणा मिळेल."

NDA : "फायटर पायलट विंगमध्ये महिलांसाठी फक्त दोन जागा राखीव होत्या. पहिल्या प्रयत्नात मी जागा मिळवण्यात अयशस्वी ठरले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात मला जागा मिळवण्यात यश आले," असे सानिया मिर्झाने ईटीव्ही भारतला सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT