Latest

Sangali : पलूस तालुक्यात विश्वजित कदम यांच्या जनसंवाद पदयात्रेस उसळला जनसमुदाय

सोनाली जाधव

पलूस : पुढारी वृत्तसेवा,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानव्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. गुरुवारी सातव्या दिवशी ही पदयात्रा पलूस तालुक्यात आली.या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी डॉ विश्वजित कदम यांच्याशी संवाद साधण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. (Sangali)

पलूस तालुक्यात दुधोंडी मधून मोठया उत्साहात पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. पदयात्रेत आमदार डॉ. विश्वजित कदम, सौ. स्वप्नाली विश्वजित कदम, कृष्णा काठ उद्योग समूहाचे अध्यक्ष जे. के जाधव ,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील, युवा नेते डॉ. जितेश कदम, शिवभवानी उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवाजीराजे जाधव, महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुधीर जाधव, पलूस सरपंच परिषदेचे अध्यक्ष विजय आरबूने, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुशील गोतपागर, पलूस काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल, पलुस कडेगाव युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद जाधव, पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले, सुहास पुदाले, सावंतपूरचे गणपतरावं सावंत, डॉ.मीनाक्षी सावंत ,सुनील सावंत,सरपंच ओंकार पाटील यांचेसह काँग्रेसचे नेतेमंडळी चालत होते.

महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या, त्यानंतर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने सहभागी होऊन शिस्तबद्ध पध्दतीने चालत होते. देशात राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो काँग्रेसच्या पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी व हुकूमशाही कारभाराबाबत विविध मुद्यांबाबत आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी जागोजागी लोकांशी संवाद साधला. आमदार विश्वजित कदम यांच्या अचूक नियोजनामुळे जनसंवाद यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

डॉ. विश्वजीत कदम यांचा नागरिकांशी संवाद : तरुणांचा मोठा सहभाग

संवाद पदयात्राचे स्वागत दुधोंडी, पुनदी, नागराळे, रामानंदनगर, बुर्ली, आमनापूर, घोगाव, तुपारी, दह्यारी, सावंतपूर, चोपडेवाडी, ब्रम्हणाळ ,खटाव, सुखवाडी, संतगाव, बांबवडे, अंकलखोप, भिलवडी, आंधळी येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात करण्यात आले. या पदयात्रेत कार्यकर्त्यांची तरुण पिढी मोठ्या संख्येने सहभागी होती. जागोजागी पदयात्रेचे होर्डिंग, बॅनर लावलेले होते. दुधोंडी ते पलूस पर्यंत मार्गक्रमण करताना या पदयात्रेत काँग्रेसचे महिला, पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेस प्रेमी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. राहुल गांधी यांचे विचार गावागावात आमदार डॉ.विश्वजित कदम पोहचविताना दिसून आले.

Sangali : संवाद यात्रेचे फुलांची उधळण, हवेत कबुतर पक्षी सोडून स्वागत 

दुधोंडी ते पलूस पर्यंत गावच्या वतीने संवाद पदयात्रेवर जेसीबी च्या सह्याने फुलांची उधळण करण्यात आली. आकर्षक रांगोळी काढून पुष्पवर्षाव करून फटाक्यांच्या आतिषबाजीत जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. जागोजागी रांगोळी, झांज पथक व ढोल- ताशा पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधले होते. महिलांनी नेतेमंडळीचे औक्षण करून त्यांच्याशी संवाद साधला.सावंतपूर मध्ये शांतीचा संदेश देत डॉ.विश्वजीत कदम ,स्वप्नाली कदम यांच्या हस्ते हवेत कबुतर पक्षी सोडण्यात आले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT