An opportunity for small parties to suddenly run the government
राजकारणातील सापशिडी Pudhari File Photo
संपादकीय

राजकारणातील सापशिडी

पुढारी वृत्तसेवा
कल्याणी शंकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

एकेकाळी राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर सत्ता गाजविणारे पक्ष कालांतराने काळाच्या ओघात लुप्त होतात, तर दुसरीकडे बहुतांश लहानसहान पक्षांना अचानक सरकार चालविण्याची संधी मिळते. असा अनुभव भारतीय राजकारणात अनेकदा आला आहे. एकवेळ तेलंगणात शक्तिशाली पक्ष म्हणून वावरलेल्या भारतीय राष्ट्रीय समितीची (बीआरएस) आजची स्थिती बिकट झाली आहे. काँग्रेस आणि माकपसारख्या सर्वात जुन्या पक्षांसह बहुतांश पक्षांच्या वाट्याला हा सापशिडीचा खेळ का येतो? कारण ते जादूई करिष्मा दाखविणार्‍या नेत्यांचा उदय-अस्त होत राहील, तोपर्यंत हा खेळ असाच सुरू राहील.

एकेकाळी राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर सत्ता गाजविणारे पक्ष कालांतराने काळाच्या ओघात लुप्त होतात, तर दुसरीकडे बहुतांश लहानसहान पक्षांना अचानक सरकार चालविण्याची संधी मिळते. असा अनुभव भारतीय राजकारणात अनेकदा आला आहे. एकवेळ तेलंगणात शक्तिशाली पक्ष म्हणून वावरलेल्या भारतीय राष्ट्रीय समितीची (बीआरएस) आजची स्थिती बिकट झाली आहे. त्याची अवस्था अन्य पक्षांसारखीच खिळखिळी होताना दिसून येत आहे. मागच्या आठवड्यात बीआरएसचे आमदार ए. गांधी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ही घटना पक्ष नेतृत्वाची पकड सैल होत असल्याचे द्योतक आहे.

तेलंगणात सत्ताधारी काँग्रेसकडे 75 आमदार आहेत आणि त्यात काँग्रेसचे 65, माकपचा एक आणि बीआरएसच्या नऊ माजी सदस्यांचा समावेश आहे. हे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण म्हणावे लागेल. भारतात सहा राष्ट्रीय पक्ष, 57 प्रादेशिक पक्ष आणि 2764 हे बिगर मान्यता पक्ष आहेत आणि ते निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवत असतात. अनेक नेत्यांनी प्रादेशिक अस्मिता जपणार्‍या आणि जातीवर आधारित हिताचे रक्षण करणारे पक्ष म्हणून स्थापन केले आणि हे राजकीय चित्र भारतीय राजकारणातील गुंतागुंत आणि कुतूहलपूर्ण स्वरूप मांडणारे आहे.

भारतात अनेक राजकीय नेते हे आपल्याच कुटुंबात राजकीय वारसा सोपविण्याबाबत सजग असतात. उदा. राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी पक्षाचे नेतृत्व पत्नी, मुलगा, मुलींमध्ये पाहिले आणि त्यांना पाठिंबा दिला. कौटुंबिक वारसा पुढे नेण्याची ही परंपरा द्रमुक, सप, जेडीएस, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि शिवसेना तसेच भारताच्या विविध राज्यांत अणि अन्य प्रादेशिक पक्षांतही स्पष्ट दिसली. शिवाय डाव्या आणि उजव्या विचारसरणीतील विभाजन भारतीय तसेच जागतिक राजकारणातही महत्त्वाचे ठरत आहे. बसपच्या काळात उजव्या विचासरणीच्या राजकारणाला मोठा पाठिंबा मिळायचा. डाव्यांची विचारसरणी बंडखोर अणि बचावात्मक आहे; मात्र ते लोकशाहीच्या द़ृष्टीने ऐक्य राखण्याचा प्रयत्न करतात. हे विभाजन राजकारणातील वास्तविकता आहे; मात्र त्याची आणखी एक महत्त्वाची बाजू आहे. 1991 नंतर भारतीय राजकारणात नवउदारमतवादाचा उदय झाला. ही एक राजकीय विचारसरणी असून, ती मुक्त बाजारातील भांडवलशाहीला आणि मर्यादित प्रमाणात हस्तक्षेप करण्याची परवानगी देते. दुसरीकडे फॅसिझम असून, त्यानुसार तळागळापर्यंत राष्ट्रवादी राजकीय विचासरणीत वाढ झालेली दिसून येते.

राजकारणात सापशिडी होण्याचे सर्वात पहिले म्हणजे प्रतिभाशाली नेत्यांवर अवलंबून राहणे हे एक कारण असू शकते. हे नेते आपल्या हिताचे संरक्षण करतात आणि ते अपेक्षेनुसार कामगिरी करत नाहीत, तेव्हा पक्षाचे नुकसान होते. दुसरे म्हणजे हे नेते दुसर्‍या नेतृत्वाचा विकास करत नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी झाल्यास पक्षाला नुकसान सोसावे लागते. ही बाब काँग्रेस आणि भाजपला लागू पडते. तिसरे म्हणजे प्रादेशिक पक्ष हे निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या घोषणा करतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर त्यांची विश्वसनीयता कमी होते. आर्थिक चक्र जसे तेजी आणि मंदीवर अवलंबून असते आणि त्याला वैचारिक राजकीय चक्राचीही जोड असते. तर दुसरीकडे एक विचारसरणी ही सैद्धांतिक रूपाने खरी असू शकते आणि लोकांमध्ये ती पूर्णपणे रुजविण्यासाठी नेहमीच मदतीची गरज भासते. कट्टर उजव्या विचारसरणीची लोकप्रियता वाढीचे श्रेय डावे, डाव्यांनी पुरस्कृत सत्ताविरोधी भावनांना द्यायला हवे. शेवटी प्रादेक्षिक पक्ष हे नेहमीच पक्षाच्या हितापेक्षा नेत्यांना खूश करण्यास प्राधान्य देतात आाणि त्यामुळे घराणेशाहीच्या राजकारणाला चालना मिळते. हे नेते स्वहित पाहतात आणि जेव्हा ते अपयशी ठरतात, तेव्हा पक्षाला नुकसान सहन करावे लागते.

जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर लोक विचारायचे, नेहरूंनंतर कोण? नेहरू यांच्यानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी यांच्यानंतरचे नेतृत्व राजीव गांधी यांच्याकडे आले आणि तसेच पुढे गेले. यादरम्यान काही करिष्मा दाखविणार्‍या नेत्यांनी पंतप्रधानपद सांभाळले. व्ही. पी. सिंह, देवगौडा, इंद्रकुमार गुजराल यांसारखे अन्य नेते पंतप्रधान झाले. त्यांना ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर्स’ असे टोपणनाव मिळाले. देवगौडा यांचा जेडीएस आणि गुजराल यांचा जनता दलाची पीछेहाट झाली. भूतकाळात काँग्रेस देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी होते आणि त्यावेळी बहुतांश विरोधी पक्ष त्याच्या पाठिंब्यासाठी आतूर असायचे. काँग्रेसच्या छत्राखाली अन्य पक्ष वावरत असत आणि ते अनेक विचारसरणीच्या पक्षाला आपल्या आघाडीत स्थान देत असत. अर्थात, काँग्रेसचा बळकटपणा पूर्वीइतका राहिला नाही. यावरून धडा म्हणजे भारतीय राजकारणात चढ-उतार दिसला तरी तो लोकशाहीचा अपरिहार्य भाग आहे. जोपर्यंत भारतीय राजकारणात जादूई करिष्मा दाखविणार्‍या नेत्यांचा उदय आणि अस्त होत राहील, तोपर्यंत सापशिडीचा खेळ सुरूच राहील.

SCROLL FOR NEXT