Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan 
Latest

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : ‘येंटम्मा’ गाण्यावर सलमानचा राम चरणसोबत लुंगी डान्स

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' ( Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan ) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ईदच्या मुहूर्तावर सलमानचा हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येणार असून दरम्यान चित्रपटातील नवनविन एकापैक्षा एक धमाकेदार गाणी रिलीज होत आहेत. या चित्रपटातील 'नयो लगदा', 'बिल्ली बिल्ली', 'फॉलिंग इन लव्ह' आणि 'बठुकम्मा' ही गाणी याआधीच रिलीज करण्यात आली आहेत. तर या यादीत आता नविन हटके 'येंटम्मा' हे गाण्याचा समोवश झाला आहे.

सलमान खान, राम चरण आणि वेंकटेश यांनी येलो कलरचा शर्ट आणि लूगी परिधान केल्याचे दिसत आहे. यासोबत अभिनेत्री पूजा हेगडेही गाण्यात डान्स करताना दिसत आहे. तिघांनी मिळून 'येंटम्मा' हे गाण्यावर लुंगी डान्स करताना दिसतात. सलमान या गाण्याचा व्हिडिओ त्याच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शमध्ये सलमानने 'येंटम्मा गाणे आउट।' अशी कॅप्श लिहिली आहे. याशिवाय गाण्यात मंदिरात फुलांची आरास, अनेक कलाकार असे दिसत आहे. सलमानचे हे गाणे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांना सलमानचा लूक आणि डान्स पसंतीस उतरला आहे. सलमानचा व्हिडिओ पाहून एका युजर्सने 'हे या वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे ठरेल'. तर दुसऱ्या एकाने 'साँग ऑफ द इयर', 'जेव्हा साऊथ आणि बॉलिवूड भेटतात तेव्हा हे घडते' यासारख्या कॉमेन्टस करत कौतुक केलं आहे. 'किसी का भाई किसी की जान' ( Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan ) चित्रपट ईदच्या मुहूर्तावर २१ एप्रिलला रिलीज होणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT