salman khan 
Latest

बिश्नोई गँगच्या हल्ल्यात सलमान थोडक्यात बचावला होता

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाबाबत मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. आता याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बिश्नोईच्या गँगच्या हल्ल्यात सलमान थोडक्यात बचावला होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा तपास सुरू असताना असा मोठा कट उघडकीस आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारण्यासाठी छोट्या-बोअर शस्त्रासह शार्पशूटर पाठवले होते. या शार्पशूटरला अभिनेता सलमानच्या घराबाहेर लक्ष ठेवण्यासाठी ठेवले होते.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या माणसांनी सलमान खानची एक रेकी केली आणि हे माहित होते की, जेव्हा तो सकाळी सायकल चालवायला जातो तेव्हा अभिनेता सुरक्षा रक्षकांसोबत जात नाही. त्यावेळी अभिनेता सलमान सुरक्षा रक्षकांशिवाय असल्याची माहिती मारेकर्‍यांना होती. त्यानुसार त्यांनी सलमान खानला संपवण्याची योजना आखली होती.

तथापि, जेव्हा शार्पशूटर त्यांचा प्लॅन अंमलात आणणार होता, पण त्यावेळी शार्पशूटरला माघार घ्यावी लागली होती. त्या दिवशी सकाळी सलमान खान त्याच्या घराबाबेर निघणार होता, तेव्हा मुंबई पोलिस त्याच्या गेटवर होते. सलमानला एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहायचे होते. यामुळे शार्पशूटर आणि त्याचे साथीदार अस्वस्थ झाले आणि त्यांनी ठरवले की त्यांनी जे नियोजन केलं होतं, ते जर अंमलात आणलं तर पोलिसांकडून पकडले जाऊ. म्हणून शार्पशूटरचा हा प्लॅन विस्कटला.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT