अर्थसंकल्प  
Latest

‘ही’ आहेत अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थसंकल्पातून संरक्षण, कृषी तसेच शिक्षणक्षेत्रासह पीएम आवास योजनेसाठी भरीव तरतूदीची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांनी घोषित केलेल्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

– संरक्षण क्षेत्रासाठी ५.९३ लाख कोटींच्या निधीची तरतूद. गतवर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी अधिक.

– संरक्षण क्षेत्रासाठीच्या निधीतून हत्यार खरेदी, सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, संरक्षण क्षेत्राशी संबंधी पायाभूत सुविधा, आत्मनिर्भरतेवर विशेष लक्ष देणार.

– रेल्वेसाठी २.४ लाख कोटींचा निधी. २०१३-१४ च्या तुलनेत यंदा ९ पटीने अधिकचा निधी.

– गरीब कल्याण योजनेसाठी २ लाख कोटी रुपये, गरीबांना वर्षभर नि:शुल्क खाद्यान्न

– किसान सन्मान निधीसाठी २.२ लाख कोटींची तरतूद

– अंत्योदय योजनेसाठी २ लाख कोटींची तरतूद. योजनेला वर्षभर मुदतवाढ

– ६ लाख कोटींच्या तरतूदीसह 'पीएम मत्स्य संपदा' योजनेची घोषणा

– आत्मनिर्भर स्वच्छता अभियानाची घोषणा

– शेतकऱ्यांना डिजिटल प्रशिक्षण दिले जाईल

– 'इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मिलेट्स' स्थापन केले जाणार

– राष्ट्रीय सहकारी डेटाबेस तयार केला जाणार

-पीएसीएस संगणकीकरणासाठी २ हजार ५१६ कोटींची तरतूद

– १५७ नर्सिंग कॉलेजची घोषणा

– ६३ हजार 'ऍग्री क्रेडिट सोसायटी' स्थापन केल्या जाणार

– औषधीनिर्माण क्षेत्रात 'इनोव्हेशन रिसर्च' करीता नवीन प्रोगाम

– राष्ट्रीय डिजिटल पुस्तकालयाची स्थापना करण्याची घोषणा

– एनजीओ सोबत मिळून साक्षरतेवर काम केले जाणार

– मच्छिमारांसाठी विशेष पॅकेज ची घोषणा

-कर्नाटकमधील दृष्काळासाठी ५ हजार ३०० कोटींची तरतूद

– पीएम आवास योजनेसाठी ७९ हजार कोटी, योजनेचा खर्चात ६६ टक्क्यांची वाढ

– रेल्वेच्या योजनेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद

– ५० अतिरिक्त विमानतळ तसेच जलमार्गावर लक्ष केंद्रित केल जाणार

– दोन वर्षांसाठी 'महिला सन्मान बचत पत्र' जारी करणार. ७.७५% व्याज दर दिले जाणार.

– वित्तीय तुटीचे लक्ष ५.९ टक्क्यांवर.बाजारातून ११.८ लाख कोटींची उचल करणार.

-एमएसएमई साठी 'क्रेडिट ग्रारंटी' योजनेची घोषणा. ९ हजार कोटींच्या निधीची तरतूद.

-नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १ कोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचा मानस. एग्रीटेक स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष निधीची तरतूद.

– जैव खत निर्मितीसाठी १० हजार प्लान्ट सुरू करणार.

-व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅन कॉर्डला ओळखपत्र रुपात वापरता येईल.

-गटारांची सफाई मशीन्सद्वारे केली जाणार.

-विवाद से विश्वास २.० ची घोषणा. एमएसएमई क्षेत्राला फायदा

-कारागीर तसेच शिल्पकारांसाठी 'पीएम विश्व कर्म कौशल्य सन्मान'पॅकेज घोषित केले आहे.

– एकलव्या विद्यालयांमध्ये ३८ हजारांंहून अधिक शिक्षकांची नियुक्ती केली जाणार

-फलोत्पादनासंबंधी योजनांसाठी २ हजार २०० कोटींची तरतूद

-लडाखमध्ये अक्षय ऊर्जेसाठी २० हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद

– २०३० पर्यंत ५ एमएमटी ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचे लक्ष्य

– ऊर्जा संक्रमणासाठी १९ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद

– ऊर्जा सुरक्षेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद

– ग्रीन क्रेडिट योजनेची अधिसूचना लवकरच जाहीर करणार

– बॅटरी ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी नवीन नियम

– ई-कोर्टसाठी ७ हजार कोटी रुपये खर्च केले जातील

– प्रधानमंत्री कौशल विकास योजना ४.० लाँच करणार आहे.

– तरुणांना आंतरराष्ट्रीय संधींसाठी कुशल बनवण्यासाठी विविध राज्यांमध्ये ३० स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्स स्थापन करण्यात येणार आहेत.

-अर्बन इन्फ्रा डेव्हलपमेंट फंडसाठी प्रति वर्ष १० हजार कोटी रुपये देण्यात येईल

-राज्यांना इन्टरेस्ट फ्री कर्ज दिली जाणार, १ वर्षाचा कालावधी यात वाढवला आहे

-शहरी विकासाठी दरवर्षी १० हजार कोटींची तरतूद.याअंतर्गत द्वितिय आणि तृतीय श्रेणीतील शहरांचा विकास केला जाणार
– 'एआय' साठी ३ केंद्रांची उभारणी भारतातील नामांकीत इन्स्टिट्यूटमध्ये केली जाणार

– नॅशनल गर्व्हनन्स पाॅलिसी राबवली जाणार

– 5 जीसाठी विकासासाठी १०० लॅब्सची स्थापना केली जाणार

– नेट झिरो कार्बनसाठी ग्रीन ग्रोथ

– ३५ हजार कोटी नेट झिरो कार्बन आणि एनर्जी ट्रान्झीशनसाठी दिले जाणार

– १५ हजार कोटी रुपये पुढील ३ वर्षांसाठी शेड्युल ट्राइब योजनेसाठी दिले जाणार

– २०४७ पर्यंत सिकलसेल, अँनेमिया संपवण्यासाठी मिशन हाती घेतले जाणार

– निवडक आयसीएमआर लॅबमध्ये सुविधा वाढवल्या जातील

-संशोधन आणि उत्पादनासाठी वैद्यकीय महाविद्यालये तयार करणार

– आर्थिक साक्षरतेला चालना देण्यावर भर

– ६३ हजार प्राथमिक कृषी कमोडिटी सोसायट्या तयार केल्या जातील

    हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT