पुढारी ऑनलाईन : नावाजलेली आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar photo) हिची ओळख आहे. सई ताम्हणकरने मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत नाव कमवले आहे. सध्या सईचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सई ताम्हणकरने नुकतेच ( Sai Tamhankar photo ) तिचे क्यूट आणि हटके फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिने पांढऱ्या रंगाच्या मिनी ड्रेसवर निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. या फोटोत तिच्या सौंदर्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरससोबत स्लिम दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने क्यूट वाटले!, नंतर हटवू शकत नाही… असे लिहिले आहे. हे फोटो सध्या खूपच चर्चेत आले असून सईच्या फोटोंनी चारचाँद लावले आहेत.
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांसोबत मराठी अभिनेत्रींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात अभिनेत्री प्रिया बापटने तीन हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. तर प्रार्थना बेहेरेने 'Uffff hottie ???' अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय अभिनेत्री अमृता खानविलकरने या फोटोवर 'ओ एकदम क्यूट' अशी हटके प्रतिक्रिया दिली आहे.
याशिवाय सईच्या या फोटोवर काही युजर्संना प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'निरमा. निरमा लूक', 'क्यूट – हॉट- ग्लॅमरस दिसतेस'. तर दुसऱ्या एकाने 'एकदम कडक राव' असे लिहिले आहे. तर आणखी एकाने तिच्यासारखी दिसणारी बार्बी डॉल बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
याआधी सईने काळ्या रंगाच्या शॉर्टड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसत असून हा देखील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एकाने 'तेरे चेहरे से', 'बोल्ड बिनधास्त आणि क्यूट' अशा हटके कॅप्शन लिहिल्या आहेत. याशिवाय चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे.
सई नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना अपडेट देत असते. सईचे सोशल मीडियावर फॉलोवर्स खूपच आहेत. तिने मराठी आणि हिंदी चित्रपटात अनेक भूमिका साकारून चाहत्याच्या मनावर अधिराज्य गाजविले. सई शेवटची मिमी या हिंदी चित्रपटात झळकली होती. यानंतर ती सध्या कलरफुल चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचलंत का?