सई लोकूर  
Latest

Sai Lokur : ‘आराम कर अति उत्साहीपणा नको’, सईनं खडसावलं (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सई लोकूर सध्या मॅटरर्निटी पीरीयड एन्जॉय करतेय. सई 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनमधून खूप लोकप्रिय झाली होती. ती तिच्या प्रेग्नेंसीतील अपडेट्स चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते. (Sai Lokur) आता सईने तिचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. पण, एका व्हिडिओला नेटकऱ्याने अशी काही कॉमेंट दिली की, त्याची चर्चा होतेय. (Sai Lokur)

संबंधित बातम्या-

२०२० मध्ये सईने तीर्थदीप रॉयसोबत विवाह केला होता. तिने आपण प्रेग्नेट असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर ती मॅटर्निटी पीरीयडमधील सोहळे, कार्यक्रम याबद्दलचे अपडेट सोशल मीडिया शेअर करत असते. तिने नुकतेच एका गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. करीना कपूरच्या अनदेखी अंजानी या गाण्यावर बेबी बंपसह डान्स केला. याचा एक व्हिडिओदेखील तिने शेअर केला. व्हिडिओला कॉमेंट्स करत अनेक चाहत्यांनी तिची काळजी देखील केली. शिवाय, ज्युनियर बाळाची आतुरता आहे, असेदेखील कमेंट्स पाहायला मिळाले. दरम्यान, एका नेटकऱ्याने केलेल्या कॉमेंट्सनंतर सईने संताप व्यक्त केलाय.

एका नेटकऱ्याने कॉमेंटमध्ये म्हटलं की- "अगं तुला हे शोभत नाही…यापेक्षा आराम कर, अतिउत्साही होऊ नकोस". यावर सई म्हणाली, "मला जे योग्य वाटतं ते मी नेहमीच करते. तुम्हाला आवडत नसेल तर बघू नका. माझ्या येणाऱ्या बाळाला मी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही? याचा मला काहीच फरक पडत नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT