पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग ॲप (Mahadev App Case) प्रकरणी ईडीने कुरेशी प्रोडक्शन हाऊससह मुंबईत ५ ठिकाणी छापेमारी केली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. आता ED ने बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर कुरेशी हाऊसवर छापा टाकला आहे. छापा (Qureshi Productions Raids) टाकला आहे. कुरेशी प्रोडक्शनच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, महादेव बुक ॲप प्रकरणी ईडीनं शुक्रवारी कुरेशी प्रॉडक्शनसह आसपासच्या इतर पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. (Mahadev App Case)
रणबीर कपूर, हुमा, नेहा कक्कड, हिना खानसह अनेक बॉलिवूड स्टार ईडीच्या निशाण्यावर आहेत. ईडीने काही सेलिब्रिटींना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.
मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी सुरु आहे. अंधेरी आणि इतर काही ठिकाणी छापेमारी अजूनही सुरू असून आर्थिक तपशीलांबाबत ईडीकडून माहिती घेतली जात आहे. कुरेशी प्रोडक्शन हे वसीम कुरेशी आणि तबस्सुम कुरेशी चालवत असल्याची माहिती समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून कुरेशी प्रोडक्शनला चित्रपट बनवण्यासाठी आर्थिक मदत मिळाली होती. कुरेशी प्रोडक्शन्स एका टॉप बॉलिवूड स्टारला घेऊन बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट बनवत आहेत. हा चित्रपट प्रादेशिक भाषेत बनवला जात असून तो इतर अनेक भाषांमध्ये डब करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.