Latest

Rohit on Hardik : हार्दिकच्या विधानावर रोहितचे प्रत्युत्तर; म्हणाला…

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने नशिबाच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गुजरात, चेन्नई आणि लखनौ प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. यांच्यासह मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला. पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईने गुजरातचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. (Rohit on Hardik)

हार्दिक पांड्याने सामन्यापूर्वी मुंबई आणि चेन्नईच्या संघांबद्दल विधान केले होते. हार्दिकचा आधीचा संघ मुंबई इंडियन्स होता. तेथील कामगिरीमुळे तो मोठा खेळाडू बनला. यानंतर तो गुजरातचा कर्णधार झाला आणि एक ट्रॉफी जिंकली. हार्दिकने मुंबई आणि चेन्नई संघातील वातावरणाबद्दल आणि खेळण्याच्या पद्धतीबद्दल सांगितले की, मुंबई संघाचा उद्देश आपल्या संघात सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश करणे आहे, तर चेन्नई आपल्या प्रत्येक खेळाडूचा योग्य वापर करून आपले सर्वोत्तम प्रदर्शन घडवून आणते. (Rohit on Hardik)

पुढे हार्दिक म्हणाला, "यश दोन प्रकारचे असते, प्रथम तुम्ही तुमच्या संघातील सर्वोत्तम खेळाडूंना घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता, ही मुंबई इंडियन्सची विचारधारा आहे. दुसरीकडे चेन्नई जिथे खेळाडू कोणही असला तरी, त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित केले जाते. माझ्यासाठी सर्वोत्तम खेळाडू विकत घेणे नव्हे तर त्यांना सर्वोत्तम वातावरण देऊन त्यांचा विकास करणे हे माझ्यासाठी अधिक प्रेरणादायी आहे."

हार्दिकच्या विधानाला रोहितचे प्रत्युत्तर

मुलाखतीदरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "खरं सांगायचं तर, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या जसे मोठे खेळाडू बनले आहेत. तसेच एक-दोन वर्षांनी टिळक वर्मा आणि नेहल वढेरा यांच्याबाबतही असेच घडेल आणि मग लोक म्हणतील की ही सुपरस्टार्सची टीम आहे. इथे आम्ही सुपरस्टार बनवतो. हे दोघेही आमच्यासाठी आगामी काळात मोठे स्टार बनणार आहेत.

विशेषत: हार्दिक पांड्यासाठी रोहितने हे वक्तव्य केल्याचे मानले जात आहे. मुंबई इंडियन्समध्ये निवड होण्यापूर्वी हार्दिक देखील मोठा खेळाडू नव्हता आणि मुंबईनेच त्याला शोधून काढले आणि त्याची प्रतिभा ओळखून त्याच्यावर काम केले. प्रत्येक संघ आपल्या खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा आणि वातावरण प्रदान करतो, ज्यामध्ये तो खेळाडूला वाढण्याची संधी देतो.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT