उस्मानाबाद : मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बापूराव पाटील | पुढारी

उस्मानाबाद : मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बापूराव पाटील

मुरुम, पुढारी वृत्तसेवा : मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांची तर उपसभापतीपदी बसवराज कारभारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १८ पैकी महाविकास आघाडीचे सर्वाधिक म्हणजे १५ जागा निवडून आल्या आहेत. यात काँग्रेस १२, ठाकरे गट  १, राष्ट्रवादी २ होते. त्यामुळे महाविकास आघाडीचेच सभापती व उपसभापती होणार हे जवळपास निश्चित होते.

त्यानुसार (२५ मे)  गुरुवारी  मुरूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडणुक प्रक्रियेसाठी नूतन संचालकांची बैठक बोलावण्यात आली.  यात महाविकास आघाडीचे नेते काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे बंधू व जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव माधवराव पाटील यांचा सभापती पदासाठी एकमेव अर्ज आला होता तर उपसभापती पदासाठी बसवराज मैलारी कारभारी यांचाही एकमेव अर्ज आल्याने या सभेचे पीठासन अधिकारी म्हणून बी. व्ही. काळे सहायक निबंधक सहकारी संस्था लोहरा यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी बाजार समितीचे प्रशासक मधुकर गुंजकर हेही उपस्थित होते .नूतन सभापती व उपसभापती यांची बिनविरोध निवड होताच महाविकास आघडीचे प्रमुख व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांनी नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार करून शुभेच्छा दिले यावेळी शिवसेना नेते बसवराज वरणाळे , राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संजय पवार ,शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापूरे, उमरगा बाजार समितीचे सभापती रणधीर पवार ,दिलीप भालेराव ,रजाक अत्तार, सुधाकर पाटील ,रशीद शेख , गोविंद पाटील , उल्लास गुरगरे , व्यंकट जाधव , धनराज मंगरूळे, नेताजी कवठे , आयुब मासुलदार ,सुजित शेळके यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या निवडीमुळे शहरात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

हॅट्रिक साधत सलग तिसऱ्यांदा सभापती पदी विराजमान होताना पत्रकारांशी संवाद साधताना नूतन सभापती बापूराव पाटील यांनी सांगतिले की कै. माधवरावजी (काका) पाटील व काँग्रेस चे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब तसेच आमच्या पाटील कुटुंबावर या परिसरातील शेतकऱ्यांनी व मतदारांनी गेली २५ ते ३० वर्षे झाले जो विश्वास दाखवत आम्हाला सातत्याने बाजार समितीत काम करण्याची संधी देत आहेत त्याबद्दल सर्व मतदारांचे आभारी आहोत. यापुढील काळात शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

हेही वाचलंत का?

Back to top button