Latest

ट्रक केबिन २०२५ पर्यंत ‘एसी’करणे अनिवार्य : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नंदू लटके

नवी दिल्‍ली, पुढारी वृत्तसेवा : देशभरात २०२५पर्यंत सर्व ट्रक केबिन वातानुकूलित (एसी) करण्याच्‍या प्रस्‍तावाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्‍यता दिली आहे. ट्रक चालक कडक उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्यात दररोज सुमारे १२ तास ड्रायव्हिंग सीटवर व्‍यतीत करतात. ट्रक ड्रायव्हर्सला वाहन चालविताना मिळणारी सुविधा आणि रस्त्यावर बरेच तास वाहन चालवण्यामूळे येणारा थकवा हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. आता रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला निर्णयामुळे देशभरातील ट्रक चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( Truck AC Cabins )

ट्रक उद्योग अपग्रेड करण्यासाठी १८ महिन्‍यांचा कालावधी

व्होल्वो आणि स्कॅनिया सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेले अत्‍याधुनिक ट्रक वातानुकूलित केबिनसह येतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्द्यावर चर्चा सुरु होती. मात्र बहुतांश भारतीय कंपन्यांनी याबाबत निर्णय घेतला नव्‍हता. आता नितीन गडकरी यांनी ट्रक केबिन वातानुकूलित करणे अनिवार्य असल्‍याच्‍या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे जाहीर केले. ट्रक उद्योग अपग्रेड करण्यासाठी १८ महिन्यांचा संक्रमण कालावधी आवश्यक असल्याचे त्यांच्या निवेदनात नमूद करण्‍यात आले आहे.

२०२५ पासून Truck AC Cabins एसी असतील : गडकरी

रस्ते वाहतूक मंत्रालयाने 2016 मध्ये ट्रक केबिन वातानुकूलित (AC) करण्याच्‍या प्रस्‍ताव दिला होता. नितीन गडकरी म्हणाले की, 'आपल्या देशातील काही ड्रायव्हर १२ किंवा १४ तास ट्रकवर असतात, इतर देशांमध्ये बस आणि ट्रक चालक किती तास ड्युटीवर असतात यावर निर्बंध आहे. आमचे चालक ४३ ते ४७ अंश तापमानात ट्रक चालवतात. आपण चालकांच्या स्थितीची कल्पना केली पाहिजे. मी मंत्री झाल्यानंतर ट्रक केबिन एसी करणे अनिवार्य करण्यास उत्सुक होतो, मात्र काही लोकांनी खर्च वाढणार असल्याचे सांगत विरोध केला. मी फाइलवर सही केली आहे की सर्व ट्रक केबिन एसी केबिन असतील, असे गडकरी यांनी स्‍पष्‍ट केले.

हा नियम ऐच्छिक असावा, अशी मागणी ट्रक उद्योगाने केली होती, असेही या वेळी गडकरी म्हणाले. एसी केबिनमध्ये केल्‍यानंतर ट्रक चालकांना डुलकी लागू शकते, असा दावाही काहींनी केला होता. बस चालकांबाबत आमची नेहमीच अशीच धारणा होती की त्‍यांच्‍या केबिन एसी झाल्‍यानंतर त्‍यांना झोप लागू शकेल. त्‍यामुळे बसच्‍याही केबिन वर्षानुवर्षे नॉन-एसी होत्या; पण व्होल्वो बसेसच्या आगमनाने ही संकल्पना मोडीत निघाली आहे. आता सर्व लक्झरी बसमध्ये चालकांसाठी एसी केबिन आहेत, असेही गडकरी यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT