नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लष्कर भरतीसाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात (Agnipath protests) तरूण रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर आज (दि.१८) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल करीत योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याची मागणी केली आहे. योजनेचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेषज्ञ समिती स्थापन करण्याची मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.
(Agnipath protests) हिंसाचार संबंधित स्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान पोहोचवणाऱ्या दोषींकडून वसुली करण्यासाठी दावा आयुक्तांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्यांना देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेचा राष्ट्रीय सुरक्षा तसेच लष्करावर पडणाऱ्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी विशेषतज्ञ समिती नेमावी, अशीही मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?