'अग्‍निपथ' विरोधात राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्‍त्र, "कृषी कायद्याप्रमाणे ही याेजना..." | पुढारी

'अग्‍निपथ' विरोधात राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्‍त्र, "कृषी कायद्याप्रमाणे ही याेजना..."

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन लष्‍कर भरतीसाठी नव्याने जाहीर करण्यात आलेल्‍या अग्‍निपथ योजनेविरोधात देशभरात हिंसाचार सुरूच आहे. देशातील अनेक राज्‍यांमध्ये तरुणांनी सुरु केलेल्‍या आंदाेलनास हिंसक वळण लागले आहे. आता यावरून राजकीय वातावरणही तापू लागले आहे. काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर टीकास्‍त्र सोडले आहे.

‘माफीवीर’ बनून देशातील युवकांचं म्‍हणणे ऐकावे लागेल

राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे की,  “सातत्याने आठ वर्षांपासून सरकारने ‘जय जवान, जय किसान’ च्या मूल्यांचा अपमान केला आहे. सरकार देशाच्या जवान आणि शेतकऱ्यांचा अपमान करत आहे. मी याआधीही म्हटले होते की, पंतप्रधानांना काळा  कृषी कायदा मागे घ्‍यावा लागेल, असे मी म्‍हटलं हाेतं. त्याचप्रमाणे ‘माफीवीर’ बनून देशातील युवकांचं म्‍हणन ऐकाव लागेल आणि ‘अग्निपथ’ योजनाही केंद्र सरकारला मागे घ्यावी लागेल. ”

प्रियंका गांधींनी केला व्हिडीओ शेअर

दरम्‍यान काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी एक व्हिडिओ आपल्‍या ट्विटरवरून शेअर केला आहे. ”आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण युवकांचे दु:ख समजुन घ्‍या. ३ वर्षात भरती झालेली नाही. पळून-पळून युवकांच्या पायांना भेगा पडल्‍या आहेत. युवक निराश आणि हताश बनले आहेत. युवक एयरफोर्स भरतीचा निकाल आणि नियुक्‍तीची वाट पाहत आहेत. सरकारने त्‍यांची कायमस्वरूपी भरती, रँक, पेन्शन, भरती थांबवली सर्व काढून घेतले.”

अग्‍निपथ योजनेविरोधात पक्षाकडून दिल्‍लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात येईल. काँग्रेसचे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार असून, ज्‍यामध्ये अनेक मोठे नेते आणि खासदार सहभागी हाेतील, असे काँग्रेस पक्षाने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button