Latest

पतीच्या हयातीत पत्नीने मंगळसूत्र काढून टाकणे ही मानसिक क्रूरता : हायकोर्ट

दीपक दि. भांदिगरे

चेन्नई; पुढारी ऑनलाईन : पतीपासून वेगळे राहणाऱ्या पत्नीने मंगळसूत्र काढून टाकणे ही बाब पतीसाठी मानसिक क्रूरता (mental cruelty) समजली जाईल, अशी टिप्पणी करत मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) पतीच्या घटस्फोट अर्जाला मंजुरी दिली. न्यायमूर्ती वी. एम. वेलूमणी और न्यायमूर्ती एस. सौंथर यांच्या खंडपीठाने इरोड येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांचे अपील स्वीकारत ही टिप्पणी केली आहे.

त्यांनी स्थानिक कुटुंब न्यायालयाचा १५ जून २०१६ रोजी दिलेला आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. या आदेशात घटस्फोटास नकार देण्यात आला होता. जेव्हा महिलेची चौकशी केली तेव्हा तिने कबूल केले होते की आम्ही जेव्हा दोघे वेगळे झालो तेव्हा आपली थाली चेन- thali (हे एक मंगळसूत्र असते जे लग्नात वधूला घातले जाते. ही चेन लग्नाच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानले जाते) काढून टाकली होती. पण, महिलेने स्पष्ट केले होते की केवळ चेन हटवली होती आणि थाली (thali) आहे तशीच ठेवली होती.

महिला वकिलाने हिंदू विवाह अधिनियमामधील कलम ७ चा संदर्भ देत म्हटले होते की थाली घालणे गरजेचे नाही आणि पत्नीने ते काढून टाकल्याने वैवाहिक संबंधांवर त्याचा कोणताही प्रभाव पडणार नाही. यावर खंडपीठाने नमूद केले की, जगातील या एका भागात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये थाली घालणे हा आवश्यक विधी आहे, ही सामान्य माहिती आहे.

या प्रकरणी न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाच्या आदेशाचाही हवाला दिला. ज्यात असे म्हटले आहे, रेकॉर्डवर उपलब्ध असलेल्या साहित्यावरून असेही दिसून येते की तिने थाली काढून टाकली आहे आणि तिने कबुली केले आहे की तिने ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली आहे. कोणतीही हिंदू विवाहित स्त्री तिच्या पतीच्या हयातीत कोणत्याही वेळी मंगळसूत्र काढणार नाही हे सर्वज्ञात सत्य होते.

खंडपीठाने पुढे म्हटले की "एका महिलेच्या गळ्यातील थाली हा एक पवित्र सौभाग्यालंकार आहे. हा सौभाग्यलंकार वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे. यामुळे पत्नीने हा सौभाग्यलंकार काढून टाकणे ही मानसिक क्रूरता दर्शवणारी कृती असल्याचे म्हटले जाऊ शकते. कारण यामुळे पतीच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात."

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT