Latest

‘या’ वयातील महिला करतात पुरुषांची फसवणूक; एका अभ्यासात उलगडले धक्कादायक सत्य

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : हे नाकारता येत नाही की वयानुसार लोकांच्या स्वभावात फरक तर पडतोच, पण जोडीदाराबद्दलच्या त्यांच्या आवडी-निवडीही बदलतात. त्यामुळेच असं म्हटलं जातं की, एका काळानंतर नातं अजिबात पुर्वीप्रमाणे राहत नाही. या काळात नात्यात बदल तर व्हायला लागतातच पण सात जन्म सोबत ठेवण्याचे वचनही कमकुवत होताना दिसते. मात्र, फसवणुकीच्या बाबतीत आतापर्यंत फक्त पुरुषच बदनाम असल्याचे आपण पाहिले आहे. पण, एका अभ्यासानुसार या प्रकरणात महिला आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

होय, हे ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण एका अभ्यासानुसार पुरुषांपेक्षा १८ ते २९ वयोगटातील महिलाकडून फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. तिला तिच्या जोडीदाराचा पटकन कंटाळा तर येतोच, पण जोडीदाराची फसवणूक करण्यासोबतच ती नवीन जोडीदार शोधू लागते.

एका अभ्यासादरम्यान विवाहित महिलांचा एका गटाचा अभ्यास करण्यात आला. त्याचे जे निकाल समोर आले ते पाहून कोणाचेही मन व्यथीत होऊ शकते. खरं तर, या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की जर एखाद्या महिलेने वयाच्या 29 व्या वर्षी लग्न केले, तर ती महिला 36 ते 37 व्या वयात असताना तिच्या पतीची फसवणूक करण्याची शक्यता जास्त असते.

या वयात मुली सर्वाधिक फसवणूक करतात

2016 मध्ये आयरिश डेटिंग वेबसाइटने केलेल्या अभ्यासानुसार, फसवणूक करण्यासाठी सर्वात धोकादायक वय 39 वर्षे आहे. याचे कारण असे की 40 पर्यंत पोहोचलेल्या लोकांचे अधिक अस्वस्थ असतात. या अभ्यासानुसार, 19 ते 29, 39 आणि 49 वयोगटातील लोक त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करण्याची शक्यता जास्त तर असतेच पण, ते स्वत:पेक्षा लहान असणाऱ्या व्यक्तीकडे अधिक आकर्षित झालेले असतात.

तज्ज्ञ काय म्हणतात

आयरिश डेटिंग वेबसाइटचे प्रवक्ते ख्रिश्चन ग्रँट म्हणतात, की आम्ही 1,000 लोकांच्या प्रोफाइलचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचा समावेश आहे. ही गोष्ट आहे की या निष्कर्षात महिलांची टक्केवारी पुरुषांपेक्षा अधिक आहे. खरं तर, आपल्या जोडीदाराची फसवणूक करणाऱ्या महिलांच्या संख्येत ४०% वाढ झाली असली, तरी पुरुषांसाठी हा दर २१% वर स्थिर आहे.

अशा परिस्थितीत मी अशा लोकांना सल्ला देईन की त्यांना जर आपल्या जोडीदाराची फसवणूक टाळायची असेल तर त्यांनी वयाच्या या टप्प्यावर सावधगिरी बाळगली पाहिजे. या काळात केवळ तुमच्या जोडीदारावर प्रेम करू नका तर त्यांची अतिरिक्त काळजी घ्या जेणेकरून त्यांना तुमच्याबद्दल अधिक प्रेम वाटेल.

लग्नानंतर ७ वर्षांनी येऊ शकतो भूकंप

जर आपण विवाहित महिलांबद्दल विचार करायचा झाला तर याचे उत्तर व्हिक्टोरिया मिलानच्या एका अभ्यासात देण्यात आले आहे, ज्यावरून असे दिसून आले आहे, की लग्नाच्या सात वर्षानंतर स्त्रिया आपल्या पतीची फसवणूक करण्याचा विचार करतात. कारण लग्नाच्या सात वर्षानंतर पती-पत्नीमधील प्रेमाची उत्कटता कमी होते.

ती केवळ कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्येच अडकत नाही, तर तिला तिच्या जोडीदारापेक्षा बाहेरचे पुरुष जास्त आवडू लागतात. बरं, फसवणूक करण्याची प्रवृत्ती कोणत्याही आकडेवारीवरून स्पष्ट करता येत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्त्रिया पुरुषांना जास्त फसवतात असे नाही, तर पुरुषही नातेसंबंधात क्रूर असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT