नसबंदीची गरज नाही ! पुरुषांसाठी संतती प्रतिबंध गोळ्यांची उंदरावर यशस्वी चाचणी | पुढारी

नसबंदीची गरज नाही ! पुरुषांसाठी संतती प्रतिबंध गोळ्यांची उंदरावर यशस्वी चाचणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुरुषांसाठी संतती प्रतिबंध गोळ्यांची उंदरावर यशस्वी चाचणी झाल्याची माहिती शास्त्रज्ञांच्या एका चमूने दिली आहे. ही चाचणी कोणतेही दुष्परिणाम न करता ९९ टक्के यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. या गोळ्यांची या वर्षाच्या अखेरपर्यंत मानवी चाचणी होऊ शकते. (Male contraceptive pill)

या संशोधनातील निष्कर्ष अमेरिकन केमिकल सोसायटीच्या स्प्रिंग मीटिंगमध्ये सादर केले जातील आणि जबाबदारी वाढवण्याच्या तसेच पुरुषांसाठी जन्म नियंत्रण पर्यायांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून चिन्हांकित केले जाईल.

१९६० च्या दशकात स्त्री गर्भनिरोधक गोळीला पहिल्यांदा मान्यता मिळाल्यापासून, संशोधकांना पुरुषांसाठी सुद्धा समकक्ष गोळी निर्मितीमध्ये रस होता असे मोहम्मद अब्दुल्ला अल नोमन या मिनेसोटा विद्यापीठातील पदवीधर असलेल्या विद्यार्थ्याने सांगितले. तोच या चाचणीचा निष्कर्ष सादर करणार आहे. (Male contraceptive pill)

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की पुरुषांना त्यांच्या जोडीदारांसोबत गर्भनिरोधक जबाबदारी शेअर करण्यात अधिक रस असतो. तो पुढे म्हणाला की परंतु आतापर्यंत फक्त दोनच प्रभावी पर्याय उपलब्ध आहेत कंडोम किंवा नसबंदी. नसबंदी उलटी शस्त्रक्रिया महाग असते आणि नेहमीच यशस्वी नसते.

महिलांसाठी असणारी गोळी मासिक पाळीत व्यत्यय आणण्यासाठी हॉर्मोन्सचा वापर करते आणि पुरुषांना तशीच समरूप विकसित करण्याच्या ऐतिहासिक प्रयत्नांमध्ये पुरुष सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनला लक्ष्य केले आहे.

तथापि, या दृष्टिकोनाची समस्या अशी होती की यामुळे वजन वाढणे, नैराश्य येणे आणि कमी घनतेच्या लिपोप्रोटीन नावाच्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे यासारखे दुष्परिणाम होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. (Male contraceptive pill)

महिलांच्या गोळ्याचे दुष्परिणाम देखील असतात, ज्यामध्ये रक्त गोठण्याचा धोका वाढतो. परंतु, गर्भनिरोधकाच्या अनुपस्थितीत महिलांना गर्भधारणा होण्याचा धोका असल्याने, जोखमीची गणना वेगळी असते.

हे ही वाचलं का ?

Back to top button