Latest

Harshal Patel : हर्षल पटेला व्हायचय ‘डेथ ओव्हर स्पेशालिस्ट’

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) शेवटच्या षटकात अर्थात डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यास अजिबात घाबरत नाही. उलटपक्षी त्याला दर सामन्यागणिक त्या अत्यंत दडपणाच्या क्षणांना सतत तोंड द्यायचे आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळणाऱ्या पटेलने डेथ ओव्हर्समध्ये आपल्या गोलंदाजीचा उत्तम वापर केला आहे. लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या सामन्यात 'डेथ ओव्हर स्पेशालिस्ट' या विशेषणाला त्याने पूर्ण न्याय दिला आहे.

लखनौवर १४ धावांनी विजय मिळवल्यानंतर हर्षल पटेल (Harshal Patel) म्हणाला, मी चांगली कामगीर करेन की नाही हे मला माहित नाही तसेच सांगू देखिल शकत नाही. पण, मला या सारख्या परिस्थितीतून सातत्याने जायचे आहे. हे मात्र निश्चित. पुढे हर्षल म्हणाला, '' मागील दोन तीन वर्षांपासून याचीच वाट मी पहात होतो. मी हरियाणासाठी शेवटच्या षटकात गोलंदाजी करत आलो आहे. हेच मी मोठ्या स्पर्धेमध्ये करु इच्छित होतो. मला वारंवार अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वत:ला पहायचे आहे. अशा वेळी मी चागली कामगिरी करेन सुद्धा अथवा अनेकदा अपयश देखिल येईल. अेनक वेळा पराभव सुद्धा अनुभवावे लागेल, मात्र मला अशा आव्हानांपासून पळायचे नाही.

हर्षल पटेल (Harshal Patel) याने लखनौ विरुद्ध शेवटच्या दोन षटकात फक्त ८ धावा दिल्या. त्याच्याकडे १८ व्या षटकात चेंडू सोपविण्यात आला होता, तेव्हा लखनौला ४१ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी खेळपट्टीवर लखनौचा कर्णधार केएल राहूल (KL Rahul) आणि मार्कस स्टॉयनीस खेळत होते.

यावेळी पटेल म्हणाला, मी दडपणा खाली होतो. अशा प्रकारच्या परिस्थितीत कोणीही दडपणाखाली असने जाहजीकच आहे. मी विचार केला की, वाईड यॉर्करने काम होणार नाही. या फलंदाजाना बादच करणे आवश्यक आहे आणि स्टॉयनिस सीमारेषेवर झेल देऊन बाद झाला.

खेळपट्टीवर येताचक्षणी उत्तुंग छटकार लगावणाऱ्या मार्कस स्टॉयनिसला (Marcus Stoinis) हर्षल पटेल याने १८ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झेलबाद केले. पटेलने त्याच्या चार षटकांमध्ये ६.२० च्या इकॉनॉमीमध्ये गोलंदाजी करत अवघ्या २५ धावा दिल्या. शेवटच्या दोन षटकात हर्षल पटेल याने अत्यंत विचारपूर्वक गोलंदाजी केली. यामुळे लखनौच्या संघावर दबाव निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत या गाष्टीचे कौतुक विरोधी संघाचा कर्णधार केएल राहूलने केले.

यावेळी केएल राहूल म्हणाला, 'असे नाही की आम्ही चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न केला नाही. पण, मधल्या षटकांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा गोलंदाजानी अत्यंत चांगली गोलंदाजी केली. हर्षलच्या दोन षटकांनी आमच्यावर दबाव वाढवला आणि त्याने शेवटच्या दोन षटकामध्ये अवघ्या आठच धावा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT