संग्रहित छायाचित्र 
Latest

रवीना टंडन आणि अक्षय कुमारचा रोमान्स सुरु असताना रणबीर कपूरला हाकलून लावले !

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क

'बँड बाजा बारात' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता रणवीर सिंहची गणना आज टॉप स्टार्समध्ये केली जाते. रणवीरने आपल्या दमदार अभिनयाने आणि उर्जेने सर्वांची मने जिंकली आहेत. एकीकडे चाहते रणवीरच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात, तर दुसरीकडे त्याचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धमाका करतात.

रणवीर सिंह लवकरच 83 या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, रणवीर सिंहला अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या शूटिंग सेटमधून बाहेर काढण्यात आले तेव्हाचा किस्सा रवीनाने शेअर केला आहे, जी सध्या 'आरण्यक' या वेबसिरीजमुळे चर्चेत होती.

रवीनाने हा किस्सा सांगितला

खरं तर, झूम टीव्हीसोबतच्या संभाषणात रवीना टंडनने किस्सा सांगितला, 'तो (रणवीर) खूप खोडकर आहे, त्याच्या बरेच गोष्टी लक्षात राहत असतात आणि मला तर सेटवरून काढून टाकण्यात आले म्हणून कायम टोमणे मारत असतो. खरंतर अक्षय कुमारसोबतचं 'टिप टिप बरसा पानी' हे पावसात चित्रित करण्यात आलेलं एक अतिशय कामुक गाणं होतं.

मला अस्वस्थ वाटत होते

यानंतर रवीना म्हणाली होती की, 'मला त्यावेळी अस्वस्थ वाटत होते. हा बिचारा मुलगा माझ्याकडे असे पाहतोय, तर मग त्याला कसं वाटत असेल. म्हणून मी निर्मात्याला विनंती केली आणि सांगितले की सेटवर फक्त पालकांना परवानगी आहे, मुलांना नाही. त्यामुळे माझा हेतू चुकीचा नव्हता. बाकी सगळ्यांना माहित आहे की मला मुलं आवडतात. मुलाशी कडक वागणारी कदाचि शेवटची व्यक्ती असेन. पण माझा असाही विश्वास आहे की प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वय असते.

रणवीर आणि रवीनाचे प्रोजेक्ट्स

दुसरीकडे, दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणवीर लवकरच कबीर खानच्या 83 मध्ये दिसणार आहे. याशिवाय 'जयेशभाई जोरदार', 'सर्कस' आणि 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा'ही रणवीरच्या खात्यात आहेत. याशिवाय रवीनाबद्दल बोलायचे झाले तर ती KGF 2 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रवीनासोबत यश आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT