पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ ओपनिंग सेरेमनीत बॉलीवूड गायक अरिजीत सिंह शिवाय अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) जलवा दाखवला. या ओपनिंग सेरेमनीत रश्मिका मंदानाने आपल्या सुपरहिट चित्रपट पुष्पा-द राईजच्या हिट गाण्यांवर जल्लोष केला. दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम फॅन्सने खचाखच भरला होता. यावेळी बॉलिवूड दिग्गजांनी उत्तम परफॉर्मन्स केला. (Rashmika Mandanna)
सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचा परफॉर्मन्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्स लगातार कमेंट्स करून रश्मिका मंदानाच्या परफॉर्मन्सवर आपली प्रतिक्रिया दिलीय. याशिवाय, अरिजीत सिंहने चित्रपट पठानचा टायटल सॉन्ग झूमे जो पठान जेव्हा गायलं तेव्हा प्रेक्षकामध्ये जोश पाहायला मिळाला.
बॉलीवूड गायक अरिजीत सिंहने केसरिया, ले पिया आणि दिल दरियादेखील गायलं. गायक अरिजीत सिंहनंतर अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या डान्सने सर्वांना डोलायला लावले. तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य गाण्यांनी सुरुवात केली.