पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर शहरातील कर्नलगंज येथील ईदगाह दफनभूमीजवळ रविवारी (दि. ८) एक दुर्मिळ गिधाड (Rare Vulture) मिळाले आहे. त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. एक स्थानिकाच्या माहितीनुसार, "गिधाड एका आठवड्यापासून ईदगाह दफनभूमीजवळ होते. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही. शेवटी, ते खाली आल्यावर त्याला पकडण्यात आले." अशा प्रकारचं गिधाड हिमालयात पहाडी भागात पाहायला मिळतं. या गिधाडाचे पंख चार ते पाच फूट लांब आहेत. सध्या त्याला कानपूर येथील पक्षीसंग्रालयात ठेवण्यात आले आहे.
अधिक माहितीनुसार, उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर शहरातील कर्नलगंज येथील ईदगाह दफनभूमीजवळ एक दुर्मिळ होत चाललेलं हिमालयीन गिधाड पकडण्यात आले. गेल्या एका आठवड्यापासून हे गिधाड तेथे होते. स्थानिक आठवडाभर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यात यश आलं नाही. अखेर ते गिधाड खाली आल्यानंतर पकडण्यात आले. या प्रकरणाची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गिधाडाला ताब्यात घेवून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.
हेही वाचा