Raj Kumar passed away 
Latest

Rajkumar Kohli passed away : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे निधन

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (दि.२४) सकाळी मुंबईत निधन झाले. ते ९३ वर्षांचे  होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जानी दुश्मन, नागिन, पत्‍नी पत्‍नी और तवैफ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ते १९६३ पासून चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी त्याचा पहिला चित्रपट 'सपनी' दिग्दर्शित केला आणि त्याची निर्मितीही केली. या चित्रपटात प्रेम चोप्रा मुख्य भूमिकेत होते. (Rajkumar Kohli passed away ) संध्याकाळनंतर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Rajkumar Kohli passed away : हृदयविकाराच्या झटक्याने निधन

माहितीनुसार, राजकुमार कोहली आज (दि.२४) सकाळी आंघोळीसाठी गेले होते. बराचवेळ होवूनही ते बाहेर आले नाहीत. तेव्हा त्यांचा मुलगा अभिनेता अरमान कोहली यांनी बाथरुमचा दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे निधन झाले आहे.

राजकुमार कोहली यांचा जन्म 1930 मध्ये झाला. त्यांनी 1960 च्या दशकात 1963 मध्ये रिलीज झालेल्या सपना आणि 1966 मध्ये पंजाबी चित्रपट दुल्ला भाटी दिग्दर्शित करून त्यांनी चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी  नागिन, जानी दुश्मन यासारखे चित्रपट केले. भारतातील पहिल्या हॉरर हिट चित्रपटांपैकी जानी दुश्मन या चित्रपटाचा उल्लेख केला जातो.

जानी दुश्मन: एक अनोखी कहानी हा चित्रपट ठरला शेवटचा…

एक अनोखी कहानी, पत्नी पत्नी और तवैफ, नौकर बीवी का, इंतेकाम यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांचे हे चित्रपट खूप गाजले.  90 च्या दशकात ते चित्रपट सृष्टीपासून दूर गेले आणि शतक संपल्यानंतर फक्त एकच चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. तो म्हणजे जानी दुश्मन: एक अनोखी कहानी. कोहली यांचा विवाह  पंजाबी चित्रपट स्टार निशी यांच्याशी झाला. निशी यांच्यासोबत त्यांनी 1963 मध्ये  पंजाबी चित्रपट पिंड दी कुडीमध्ये काम केले होते. राजकुमार आणि निशी यांना गोगी आणि अरमान अशी दोन मुले आहेत. त्यांचा लहान मुलगा अरमान हा देखील अभिनेता आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT