पिंपरी: बच्चेकंपनीसाठी ई पुस्तके, गोष्टींचे अ‍ॅप्स मनोरंजनाचे दालन, उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन | पुढारी

पिंपरी: बच्चेकंपनीसाठी ई पुस्तके, गोष्टींचे अ‍ॅप्स मनोरंजनाचे दालन, उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

वर्षा कांबळे

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: मुलांना दर्जेदार बालसाहित्य सहजपणे, मोफत उपलब्ध व्हावे, यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. यासाठी बालमेळावे, बालमहोत्सव आणि बालनाट्य, बालवर्ग सुरू झाले आहेत; तसेच इंटरनेटवरही लहान मुलांसाठी यू ट्यूब चॅनेल, मोफत ई-पुस्तके असलेली संकेतस्थळे, गोष्टींचे अ‍ॅप्स अशा माध्यमांतून मुबलक बालसाहित्य उपलब्ध आहे. सध्या मुलांच्या शाळांना सुटी असल्याने बालसाहित्य बच्चेकंपनीचे मनोरंजन करत आहेत.

सध्या उन्हाच्या तडाख्यामुळे मैदानावर खेळणे त्रासाचे ठरतेय; तसेच गावाकडे जावे म्हटले तर पाणीटंचाई यामुळे मुलांना मामाचा गाव किंवा आपला गाव दूरच राहिला आहे. अथवा चार ते आठ दिवस धावती भेट घेण्यापुरता मर्यादित आहे. एरवी शाळांच्या दिवसातही मुलांच्या हातात सतत स्मार्ट फोन असल्याने कार्टुन पाहण्यावर नियंत्रण नाही. मात्र, तेचतेच कार्टुन दिवसभर पाहून मुलांना कंटाळा येतो. आत अभ्यासही नाही. मग यू ट्यूबवर उपलब्ध असलेले बालसाहित्य मुलांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या लहान मुलांसाठी क्लासिक नर्सरी टाईम्स, मराठी धमाल बालगीते, स्टोरी टेलिंग अ‍ॅप असे असंख्य पर्याय उपलब्ध असली तरी त्यातून उत्तम, एखाद्या विषयाला वाहिलेली पुस्तके शोधून काढून ती पाहिली जात आहेत.

ई पुस्तकांचा वापर

शाळा, वाचनालये बंद असल्यामुळे मुलांना नियमितपणे वाचायला पुस्तके मिळत नाहीत. शहरी मुलांना डीजिटल पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, ग्रामीण भागात काही ठिकाणी इंटरनेटची उपलब्धता नसते. अशा परिस्थितीत मुलांपर्यंत पुस्तके आणि गोष्टी सहज पोहचत नाहीत. या दोन गोष्टींची सांगड घालण्यासाठी, दर्जेदार साहित्य निवडून, थोडक्या इंटरनेटच्या मदतीने, सहजगत्या मुलांच्या हातात नेऊन पोचवण्यासाठी ई- पुस्तकांसारखे उपक्रम सुरू झाले आहेत.

बालनाट्य वर्ग, महोत्सव, बालमेळावे

शहरात सुटीच्या दिवसांत काही सांस्कृतिक संस्थांकडून बालनाट्यवर्ग चालविले जातात. यामध्ये कथांवर आधारित नाटके बसवून अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाते. काही शहरामध्ये बाल साहित्य महोत्सव भरविले जातात. मात्र, यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे
मुलांचा ओढा जास्त करून डीजिटल साहित्यावर असतो.

Back to top button