पुढारी ऑनलाईन : पुढच्या २४ तासात राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूरसह, दक्षिण कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा या बहुतांश भागात पुढच्या २ ते ३ तासात मेघगर्जनेसह पावसाची (Rainfall warning) शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.
हवामान विभागाचे प्रमुख होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, (Rainfall warning) दक्षिण कोकण किनारपट्टीसह, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, सांगली कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ याठिकाणी पुढच्या काही तासात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुण्यात देखील ढगाळ वातारवण असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, १० मे रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाल्याबरोबर महाराष्ट्रातील पाऊस (Rainfall warning) कमी होईल. तसेच कमाल तापमानात ५ ते ६ अंशांनी वाढ होऊन पुन्हा कडक उन्हाळा सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.