file photo 
Latest

Raigad : मुंबई एक्सप्रेस वेवर टेम्‍पाेला अपघात; १४ टन टोमॅटो रस्त्यावर

सोनाली जाधव

खोपोली, पुढारी वृत्तसेवा : चालकाचा ताबा सुटल्‍यामुळे टाेमॅटाेने भरलेल्‍या टेम्‍पाे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पलटी झाला. सुमारे १४ टन टोमॅटोचा माल रस्त्यावर पसरले. ही दुर्घटना रविवारी मध्‍यरात्री घडली. अपघाताच्या दरम्यान कोणतेही वाहन बाजूला नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्‍यान, अपघातामुळे टोल नाक्यावरील बाहेर पडणारी लेन बंद झाली हाेती. मात्र आयआरबी अधिकार्‍यांनी वाहनांना बाहेर पडण्यासाठी पर्यायी दुसरी लेन सुरू केली.  (Raigad)

Raigad : १४ टन टोमॅटो रस्त्यावर

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार,पुण्याहून टेम्‍पाे घेऊन चालक राकेश कुमार वाशी पीएमसीमध्ये निघाला होता. बोरघाटातून खाली उतरत असताना ब्रेक फेल झाल्याचे चालकाचा लक्षात आले. बोरघाटातून मार्ग काढीत खालापूर टोल नाक्याजवळ मध्यरात्री 12 :15 च्या दरम्यान टेम्‍पाे रस्त्याच्या बाजूला घेत असताना चालकाचा ताबा सुटला. टेम्‍पाे टोल नाक्यावर असणाऱ्या दुभाजकाला धडकून पलटी झाला. १४ टन टोमॅटोचा माल रस्त्यावर पसरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आयआरबी डेल्टा फोर्स, खालापूर टोल नाक्यावरील अधिकारी, कर्मचारी, कामगार, बोरघाट पोलीस कर्मचारी मदतीला धावले. त्‍यामुळे नुकसान काही प्रमाणात कमी झाले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT