Latest

Rahul Gandhi@Cambridge: केंब्रिजमधील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर ‘भाजपचा हल्लाबोल’…बदनाम करणे ही सवयच’

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठातील व्याख्यानात केलेल्या भारतातील हेरगिरीच्या आरोपानंतर भाजप आक्रमक झाले आहे. पक्षाचे नेते अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी (दि.०३) राहुल यांचे वक्तव्य खोटे आणि भारताची बदनामी करणारे असल्याचे म्हणत राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, कालच्या ईशान्य भारतातील निवडणूक निकालामुळे काँग्रेस पुन्हा एकदा नेस्तनाबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी परदेशी भूमीत जाऊन रड गाण्याचे काम करत आहेत, असे म्हणत मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसला डिवचले आहे.

हेरगिरीचा संयश होता तर मोबाईल तपसासाठी का दिला नाही? असा प्रश्न करत हा पेगासस अन्य कुठे नाही तर तो राहुल गांधींच्या मन आणि बुद्धीत आहे. पेगासेस पर अशी काय मजबुरी होती की, राहुल गांधी यांनी आपला मोबाईल जमा नाही केला. असे नेते की जे भष्ट्राचार प्रकरणी जामीनावर बाहेर आहेत, त्यांच्या मोबाईलमध्ये असे काय होते की त्यांना आजपर्यंत लपवून ठेवले जात आहे. राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी मग अधिकाऱ्यांकडे मोबाईल का जमा नाही केला, असा प्रश्न देखील अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

जगात मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताचा जो आदर वाढला आहे. तो आज जगभरातील नेते देखील बोलून दाखवत आहेत. मोदीजींवर जगभरातील लोकांचे प्रेम आहे, ते जगाचे लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहे. आज ते देशातच नाही तर जगभरातील मोठे नेते आहेत, हे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष बहुधा मान्य करू शकत नाही. त्यामुळे ते भारताबाबत नेहमी नकारात्मक बोलत असतात, अशी टीका देखील भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT