नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात उद्यापासून (दि. २६) कसोटीची मालिका होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यादरम्यान भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यात वाद सुरू आहे. यावर प्रसारमाध्यमांनी द्रविड यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
विराट कोहलीला भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्याचा निर्णयाबाबत द्रविड यांना विचारण्यात आले. यावर द्रविड म्हणाले की, कर्णधार निवडणे हे माझे काम नाही. ते निवड समितीचे काम आहे.
कर्णधार निवडीचा निर्णय निवड समितीचा आहे कर्णधार निवडण्याचे माझे काम नाही. याविषयावर चर्चा करण्यासारखी सध्या स्थिती नाही. आमचे संपूर्ण लक्ष कसोटी मालिकेवरच आहे. मालिका जिंकण्यासाठी तुम्ही कुठल्या एका खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही फक्त विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते आणि त्या दृष्टीनेच आम्ही पुढे जात आहे, असेही द्रविड म्हणाले.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात सर्वकाही ठीक नाही, अशी चर्चा रंगली आहे. स्नायू दुखापतीमुळे रोहित शर्माने कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर कोहलीही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वन-डे मालिकेतून विश्रांती घेत असल्याच्या बातम्यांनी उलटसुलट चर्चेला आणखी ऊत आला होता.
एकदिवसीय मालिकेतील कर्णधारपदाबाबत बोलताना विराट म्हणाला की, 'मला कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडायची होती; पण कसोटी संघाच्या निवडीदरम्यान निवड समितीने एकदिवसीय कर्णधारपद काढून घेत असल्याचे सांगितले. एकदिवसीय कर्णधारपद परत घेतल्याने आपल्याला काहीच हरकत नाही.'
दक्षिण आफ्रिका दौर्यातील एकदिवसीय मालिकेबाबत बोलताना विराट म्हणाला की, 'मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहे आणि यापूर्वीदेखील उपलब्ध होतो. मला नेहमी खेळायचे असते. मी बोर्डासोबत कधीही ब्रेकबद्दल बोललो नाही.टी-20 कर्णधारपदाबाबत विराटने सांगितले की, 'टी-20चे कर्णधारपद सोडण्याबाबत मी बीसीसीआयला सांगितले होते.माझ्या या निर्णयाचा बीसीसीआयने चांगल्या पद्धतीने स्वीकार केला. बोर्डाने मला हे चांगले पाऊल असल्याचे म्हटले.मी तेव्हाच बोर्डाला एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व करायचे असल्याचे म्हटले होते.तसेच त्यांना जर असे वाटत नसेल तर, काहीच अडचण नसल्याचेदेखील अधिकार्यांना सांगितले होते.'
हेही वाचलं का?