पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC स्पर्धेचा अंतिम सामना खेळत आहे. हा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या तीन दिवसामध्ये ऑस्ट्रेलियन संघ आघाडीवर आहे. सामन्यात भारतीय संघासाठी सकारात्मक घटना घडली ती म्हणजे अजिंक्य रहाणेची केलेली. १८ महिन्यांनंतर संघात पुनरागमन करत असलेल्या रहाणेने दुखापत होवूनही त्याने संघासाठी ८९ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर अजिंक्यची पत्नी राधिकाने इंस्टाग्राम एक भावनिक पोस्ट केली आहे. (Ajinkya Rahane)
डावाच्या सुरूवातीलाच अजिंक्यला दुखापत झाली होती. २२ व्या षटकात पॅट कमिन्सने टाकलेला बॉल उसळी घेत अजिंक्यच्या उजव्या हाताच्या बोटावर आदळला. वेदना होत असताना ही अजिंक्यने आपली खेळी सुरू ठेवली. दुसऱ्या दिवशी त्याने नाबाद राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याच्या या लढवय्या खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. यामध्ये त्याची पत्नी राधिका हीने देखील एक भावनिक पोस्ट केली आहे. (Ajinkya Rahane)
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये राधिका म्हणते की, 'बोटाला सूज आलेली असतानाही तू चाचणी करण्यास नकार दिलास. कारण, तुला फलंदाजीवरून लक्ष इतरत्र वळवायचे नव्हते. यातून तु तुझा निस्वार्थीपणा व ध्येय दाखवून दिले. दृढ निश्चयाने तू तिथे उभा राहिलास. सर्वांना प्रेरणा दिलीस. तुझ्या याच वृत्तीचा मला नेहमी अभिमान वाटतो.'
हेही वाचा;