Mumbai NCB Raid: डोंगरी परिसरातून २० किलो मेफेड्रोन, सव्वा कोटीची रोकड जप्त; महिलेसह दोघांना अटक | पुढारी

Mumbai NCB Raid: डोंगरी परिसरातून २० किलो मेफेड्रोन, सव्वा कोटीची रोकड जप्त; महिलेसह दोघांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत आंतरराज्य अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा एनसीबीच्या पथकाने आज (दि.१०) पर्दाफाश (Mumbai NCB Raid) केला. मुंबईच्या डोंगरी परिसरात छापामारी करून तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 20 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याचबरोबर 186.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 1 कोटी 10 लाख 24 हजारांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी एन. खान, ए.अली आणि एएफ शेख नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई (Mumbai NCB Raid) येथील डोंगरी परिसरात आंतरराज्य अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक रॅकेट सक्रीय असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्याआधारे एन. खान यांच्या घराच्या परिसरात सापळा लावला होता. त्याचा सहकारी ए.अली देखील याच परिसरात असल्याचे माहिती मिळाली. ए.अली याला अडवून त्याच्याकडून 3 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. एन.खानच्या घराची झडती घेतली असता आणखी 2 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. एएफ शेख नावाची डोंगरी येथील महिला ड्रग्सचा पुरवठा करत असल्याची माहिती एन.खानने चौकशीदरम्यान दिली.

त्यानंतर एनसीबीच्या पथकाने त्या महिलेच्या घराची झडती घेतली असता 15 किलो मेफेड्रोन आढळून आले. तसेच 1 कोटी 10 लाख, 24 हजार रोख रक्कम आणि 186.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सापडले. सुरुवातीला महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कुशलतेने तिची चौकशी केली. त्यानंतर तिने कबूल केले की, ड्रगच्या पैशाच्या आर्थिक उत्पन्नातून इतकी माया जमा केल्याचे सांगितले. तिच्याकडून आणखी काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, या प्रकऱणातील तिन्ही आरोपी मागील 7-10 वर्षांपासून तस्करीच्या व्यवसायात सक्रीय आहेत. आरोपी महिलेने नेटवर्क अनेक शहरांमध्ये पसरविले होते. या माध्यमातून ती करोडो रुपयांच्या ड्रगचा मोठ्या प्रमाणात व्यवहार करत होती. अंमली पदार्थांची तस्करी आणि आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी तिने एक कंपनी देखील काढली होती. या प्रकरणातील उर्वरित साथीदारांचा आणि इतर मालमत्तेचा शोध घेण्यासाठी सखोल तपास केला जात आहे.

हेही वाचा 

Back to top button