Ashwin's Wife : अश्विनच्या पत्नीच्या या कृत्याने सारेच झाले चकीत.. 
Latest

Ashwin’s Wife : राेहित शर्माच्‍या पत्‍नीला अश्विनच्‍या पत्‍नीने ‘सावरले’…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित केवळ २ धावा करत बाद झाला. मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सने १५९ धावांचे आव्हान दिले होते. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा राजस्थानने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना स्वस्तात माघारी परतला.  रविचंद्रन अश्विन तिसरे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने तिसऱ्याच चेंडूवर रोहितला बाद केले. (Ashwin's Wife)

अश्विनच्या पत्नीने मारली रितिकाला मिठी

दरम्यान, प्रेक्षक गॅलेरीमध्ये बसलेली रोहित शर्माची पत्नी रितिका निराश होऊन रडू लागली. रितिका रडत आहे हे रविचंद्रन अश्विनची पत्नी प्रिती नारायण हिने पाहिले. अश्विनच्या पत्नीने आणि रितिकाला सावरत मिठी मारली. यानंतर अश्विनच्या पत्नीने रितिकाला सावरले या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. रविचंद्रन अश्विनची पत्नी प्रिती नारायण हिचे प्रक्षेकांकडून कौतुक होत आहे.

यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये रोहित शर्मा त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. राजस्थान विरुद्‍धच्‍या सामन्यादिवशी रोहितचा वाढदिवस होता त्यादिवशीही त्याला सूर गवसला नाही. त्यानंतर रोहितची पत्नी रितिका भावूक होताना दिसली. रोहित शर्मा आयपीएलच्या या हंगामात एकही अर्धशतक झळकावू शकलेला नाही. दिल्ली कॅपिटल्स वि. ४१ धावांची खेळी ही त्याची सध्याच्या आयपीएल हंगामातील आतापर्यंतची सर्वांत मोठी खेळी होती. (Ashwin's Wife)

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT