Latest

शिवसेनेला आणखी एक धक्का; दादरमधील ९ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह सेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यातच आता सेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आमदार सदा सरवणकर यांनी दादरच्या विभाग प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर शाखाप्रमुख, उपविभाग संघटक यांच्यासह ९ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

या पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा 

आमदार सदा सरवणकर – विभाग प्रमुख
संदीप देवळेकर – शाखाप्रमुख
संतोष तेलवणे – शाखाप्रमुख
अजय कुसूम – शाखा समन्वयक
कुणाल वाडेकर – उपविभाग समन्वयक
मिलिंद तांडेल – शाखाप्रमुख
अरुंधती चारी – महिला शाखासंघटक
शर्मिला नाईक – महिला उपविभाग समन्वयक
मंदा भाटकर – शाखा संघटक

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT