Latest

 Nafed : नाफेडमार्फत लासलगाव बाजार समितीतून आजपासून कांदा खरेदी

अविनाश सुतार

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या उद्दिष्टानुसार ग्राहकांच्या हितासाठी नाफेड (Nafed) व महाएफपीसीचा महाओनिअन हा संयुक्त उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीला राज्यासह मध्यप्रदेश आणि गुजरात येथील काही बाजार समित्यांमध्ये आज (दि.१६) पासून सुरुवात झाली. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून  शनिवारी पहिल्याच दिवशी १० वाहनांतून १५० क्विंटल कांद्याची खरेदी केली. त्याला कमाल ११९७ रुपये, किमान १०१५ रुपये, तर सर्वसाधारण ११४१ रुपये इतका प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

(Nafed) मागणीच्या तुलनेत देशांतर्गत कांद्याचा पुरवठा अधिक होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत कांद्याचे सर्वसाधारण बाजारभाव १ हजार रुपयांच्या आत आले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आली होती. नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील बल्हेगाव येथील अनिल ताडगे या कांदा उत्पादक शेतकऱ्याला गुरुवारच्या तुलनेत आज लासलगाव बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्यातून फायदा झाल्याचे दिसून आले.

गुरुवारी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला ९६५ रुपये इतका प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याला बाजार भाव मिळाला होता. त्यातीलच कांदा आज पुन्हा लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणला. त्या कांद्याला नाफेडने ११४१ रुपये प्रति क्विंटलला बाजार भावाने खरेदी केल्याने या कांदा उत्पादक शेतकऱ्यांने समाधान व्यक्त केले. नाफेडने जास्तीत जास्त कांदा खरेदी करत शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळवून देण्याची मागणी केली आहे.

व्यापारी आणि नाफेडमध्ये बाजार भावाची स्पर्धा झाल्यास नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. आज जरी कांद्याच्या  बाजार भावात पाहिजे तितका फायदा दिसून आला नसेल. मात्र, येणाऱ्या दिवसात नक्कीच शेतकऱ्यांना नाफेड खरेदीचा फायदा होणार असल्याचा विश्वास आहे. शेतकऱ्यांनी आपला कांदा प्रतवारी करुन आणल्यास योग्य बाजार भाव मिळण्यास मदत होणार आहे.
– सुवर्णा जगताप, सभापती (बाजार समिती लासलगाव)

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT