KKR vs PBKS 
Latest

KKR vs PBKS : पंजाबचे केकेआरसमोर १८० धावांचे आव्हान

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएल २०२३ मधील ५३ वा सामना खेळवला जात आहे. हा सामना ईडन गार्डनवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने आहेत. दरम्यान, पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जने १७९ धावा केल्या आणि केकेआर समोर १८० धावांचे आव्हान ठेवले आहेत. (KKR vs PBKS)

शिखर धवनची अर्धशतकी खेळी आणि पंजाब किंग्जच्या फलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर पंजाबला १७९ धावांचा टप्पा गाठता आला. पंजाब किंग्जकडून ४७ चेंडूमध्ये ५७ धावा, जितेश शर्मा १८ चेंडूमध्ये २१ धावा, लिवम लिविंगस्टोन ९ चेंडूमध्ये १५ धावा, प्रभसिमरन सिंग ८ चेंडूमध्ये १२ धावा आणि रिषी धवनने ११ चेंडूमध्ये १९ धावांचे योगदान दिले. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने ३, हर्षित राणाने २ तर सुयश शर्मा आणि नितीश राणाने प्रत्येकी १ विकेट पटकावली. (KKR vs PBKS)

पंजाब किंग्जचा संघ – प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे लिवम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन, शारुख खान, हरप्रीत बरार, रिषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग (KKR vs PBKS)

केकेआरचा संघ – रेहमनुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनिल नरेन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुय़श शर्मा, वरुण चक्रवर्ती (KKR vs PBKS)

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT