पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा कर्णधार करणने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी जॉनी बेअरस्टोचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला आहे. त्याचबरोबर कोलकाताने प्लेइंग-11 मध्येही बदल केला आहे. मिचेल स्टार्कच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या जागी दुष्मंथा चमीराचा संघात समावेश करण्यात आला आहे. चमीराला स्टार्कने केकेआरसाठी पदार्पण कॅप दिली.
कोलकाताला 13व्या ओव्हरमध्ये दुसरा धक्का बसला. पहिल्या दोन बॉलवर दोन षटकार मारल्यानंतर सॅम करनने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर सॉल्टला क्लीन बोल्ड केले. सॉल्टने 37 बॉलमध्ये 75 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौकार आणि सहा षटकार मारले.
कोलकाताला 11व्या षटकात 138 धावांवर पहिला धक्का बसला. राहुल चहरने सुनील नरेनला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. 32 बॉलमध्ये 71 धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि चार षटकार मारले.
कोलकाताने नऊ ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 118 धावा केल्या आहेत. नरेन 27 चेंडूत 60 धावा तर सॉल्ट 27 चेंडूत 52 धावा करत फलंदाजी करत आहे. सॉल्टने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक 25 चेंडूत पूर्ण केले. या मोसमातील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले.
आठ ओव्हरच्या खेळामध्ये कोलकाताने एकही विकेट न गमावता 105 धावा केल्या आहेत. सध्या फिल सॉल्ट २४ चेंडूत ४६ धावा करत असून सुनील नरेन 24 बॉलमध्ये अर्धशतकी खेळी केली. नरेनचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे अर्धशतक आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने पॉवर प्लेमध्ये बिनबाद 76 धावा केल्या. सध्या सुनील नरेन 15 चेंडूत 38 धावा तर, फिल सॉल्ट 21 चेंडूत 35 धावांवर फलंदाजी करत आहे. सहाव्या षटकात अर्शदीपच्या चेंडूवर कर्णधार सॅम करनने सॉल्टचा सोपा झेल सोडला. त्यानंतर सॉल्ट 34 धावांवर खेळत होता. पंजाबला ही भागीदारी तोडावी लागेल, अन्यथा दोघेही पंजाबसाठी धोकादायक ठरू शकतात.
हेही वाचा :