पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील मनसे नेते व नगरसेवक वसंत मोरे यांनी आज (दि.१२) मनसेच्या सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मोरे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवलेले राजीनाम्याचे पत्र पोस्ट केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूवी मोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. Vasant More
वसंत मोरे यांनी पत्रात म्हटले आहे की, पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु, अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत, यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो, त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून 'कोंडी' करण्याचे 'तंत्र' अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे.Vasant More
हेही वाचा