Latest

Pune MNC : पुणे मनपाच्या २७ प्रभागांमध्ये इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा

backup backup

आगामी महापालिका निवडणूकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीमध्ये ५५ पैकी २७ प्रभागांमध्ये महिलाराज असणार आहे. (Pune MNC) म्हणजेच या २७ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित होणार असून एक जागा खुला वर्गासाठी असणार आहे. त्यात आरक्षण सोडतीत या प्रभागांमध्ये आरक्षण पडल्यास प्रामुख्याने खुल्या वर्गातील इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा वाजणार आहे.

महापालिका निवडणूकीसाठी कच्चा प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेत २०११ च्या जनगणनेनुसार १६६ नगरसेवक ५५ प्रभाग असणार असून त्यात तीन सदस्यीय ५४ तर १ प्रभाग हा चार सदस्यांचा असेल असेही निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे. येत्या आठवड्याअखेरीपर्यंत पक्क्या प्रभाग रचनेसह आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच खर्‍या अर्थाने निवडणूकीचे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.

Pune MNC : जशी प्रभाग रचना तशी राजकिय गणिते

दरम्यान प्रभाग रचना कशी असणार याबरोबर आरक्षणाची गणितेही कशी असणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. याबाबत पुढारीने घेतलेल्या माहितीनुसार ५५ पैकी २७ प्रभागांमध्ये प्रत्येकी २ महिला वर्गासाठी आरक्षण असणार आहे. त्यात अनुसुचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग या प्रवर्गातील महिलांसह खुल्या वर्गातील महिलांचा समावेश असणार आहे.

कसे असेल नक्की महिला आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. त्यानुसार महापालिकेच्या ए़कूण नगरसेवकांची संख्या १६६ इतकी आहे. त्यात ५० टक्केनुसार म्हणजेच ८३ इतक्या महिला असणार आहेत. आता ५४ प्रभागांमध्ये प्रत्येकी १ महिला असून चार सदस्यांच्या एका प्रभागात अशा ५६ महिलांची आरक्षणे सरळपध्दतीने पडणार आहेत.

८३ मधून ५६ महिलांची आरक्षणे निश्चित झाल्यानंतर उर्वरीत २७ महिलांसाठी तीन सदस्यांच्या ५४ प्रभागांमध्ये पुन्हा लॉटरी पध्दतीने महिलांसाठी आरक्षण निघणार आहे.

त्यामुळे या २७ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन महिला असणार आहेत. त्यामुळे या प्रभागांमध्ये खुल्या वर्गासाठी केवळ एकच जागा असणार आहे. त्यातही या खुल्या जागेवर पुन्हा महिला इच्छुकाला निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध राहणार असून एका प्रभागात तीन महिला येऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT