Latest

Pune Crime News : बंद घरात पती- पत्नीचा मृतदेह

अमृता चौगुले

पुणे/येरवडा : पुढारी वृत्तसेवा : लोहगाव परिसरातील एका बंद घरात पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला. पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर पत्नीचा बेडवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह होता. दरम्यान, हा प्रकार खुनाचा आहे की आत्महत्येचा, हे मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. किरण महादेव बोबडे (वय 23), आरती किरण बोबडे (वय 20, दोघे रा. वडगाव शिंदे रोड, लोहगाव) अशी दोघांचे नावे आहेत.

ही घटना सोमवारी (दि.6) सकाळी अकराच्या सुमारास येथील लोहगाव वडगाव शिंदे रोड, लेक व्ह्यूव सिटी या सोसायटीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घरातून दुर्गंधी येत असल्याचे घरमालक प्रशांत यादव यांच्या निदर्शनास आले. ते वरती, तर बोबडे दाम्पत्य खालच्या मजल्यावर राहत होते.

त्यांनी याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खोलीचा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, किरणचा मृतदेह छताच्या हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला, तर पत्नी आरती ही बेडवर मृत अवस्थेत मिळून आली. तिचा मृतदेह कुजण्यास सुुरुवात झाली होती. शनिवारी सकाळपासून त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. अंदाजे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर पंचनामा झाल्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. किरण हा पोस्टात कंत्राटी नोकरी करत होता. तो मूळचा माजलगाव बीड येथील राहणारा आहे, तर पत्नी आरती ही येरवड्यातील असून, एका खासगी बँकेत नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला असून, पाच महिन्यांपासून ते या ठिकाणी भाड्याने राहण्यास आल्याचे समजते.

लोहगाव परिसरातील एका सदनिकेत पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमके काय घडले हे समोर येईल. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

आनंदराव खोबरे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ.हडपसर पोलिस ठाण्यासमोर कारमध्ये मृतदे

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT