file photo  
Latest

पुणे : ताम्हिणी घाटात सहा दिवसांच्या बाळाला खोल दरीत फेकले

अमृता चौगुले

पौड (जि. पुणे) : पुढारी वृत्तसेवा : ताम्हिणी घाटातील दरीपूल परिसरात प्रेमसंबधातून झालेल्या सहा दिवसांच्या बाळाला खोल दरीत टाकून देण्याची घटना घडली. पौड पोलिस, आदरवाडी ग्रामस्थ तसेच काही ट्रेकर्स या बाळाचा शोध युध्द पातळीवर घेत आहेत.

सुत्राच्या माहितीनुसार, शेळकेवाडी- गोडांबेवाडी येथे एक २७ वर्षीय महिला येथे सचिन गंगाराम चव्हाण (मूळ रा. आंबडस, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांच्या सोबत राहत होती. सदर महिलेचा पहिला विवाह झालेला होता. पहिल्या पतीपासून या महिलेस ११ वर्षाची मुलगी देखील आहे. मात्रपतीच्या निधानानंतर नात्यातील सचिन याच्याशी प्रेमसंबध जुळल्याने तिघेही जण २०२१ मध्ये शेळकेवाडी येथे राहू लागले. सचिनचे भाऊ संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजय गंगाराम चव्हाण (तिघेही रा.आबंडस, ता. खेड) हे सचिनला बरोबर राहू नकोस म्हणून सांगून घेऊन जात असत. डिसेंबर महिन्यात या महिलेला नववा महिना सुरू झाल्याने आधाराची गरज असल्याने तिने सचिनला बोलावून घेतले.

या महिलेची प्रसूती ३० जानेवारी रोजी होऊन या महिलेने एका मुलाला जन्म दिला. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता फिर्यादी महिला, तिची मुलगी व सचिन घरात असताना सचिनचे तिनही भाऊ येथे येऊन आपण आमच्या गावी जाऊन राहून म्हणून या तिघांना घेऊन गेले. पौडमार्गे ताम्हिणी घाटातून जात असताना एका दरीपूल वळणाजवळ गाडी थांबवून या चौघांनीही संगनमत करून सहा दिवसाच्या बाळाला ओढून घेतले. फिर्यादी महिला व मुलीस गाडीतच बसवून ठेवले. पाऊण तासाने हे चौघेही परत आले व आंबडसच्या दिशेने जावू लागले असताना महिलेने बाळाविषयी चौकशी केली असता तर गप्प बस नाहीतर तर तुला व तुझ्या मुलीलाही दरीत फेकून देऊ अशी धमकी दिली.

या चौघांनी सदर महिला व तिच्या मुलीस आंबडस येथे नेऊन डांबून ठेवले. १० तारखेला सचिन व त्याच्या भावांनी सदर महिलेस शेळकेवाडी येथे जाऊन राहा येथे राहू नकोस म्हणून सोडून दिले. ही महिला आंबडसहून माणगाव व नंतर पौड पोलिस स्टेशन येथे आली. घटनेची माहिती पौड पोलिसांना दिल्यानंतर पौड पोलिसांनी आंबडस येथे जाऊन या चौघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ताम्हिणी घाट परिसरात बाळाला टाकून दिलेल्या परिसरात बाळाचा शोध घेण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.या परिसरात पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पवन चौधरी तसेच आदरवाडी, निवे, डोंगरवाडी ग्रामस्थ व काही ट्रेकर्स या बाळाचा शोध घेत आहेत.

हे ही वाचलं का  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT