ठाणे: पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात शिवसेनेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाण्यातील आनंद आश्रमासमोर आज (दि.३) शिवसेना महिला आघाडी आणि युवासेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला संताप व्यक्त केला. संजय राऊत यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसैनिकांनी यावेळी केली.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या कृत्यानंतर शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. आनंद आश्रम येथे युवा सेना महिला आघाडीचे वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी टेंभी नाका येथील स्वच्छतागृहात संजय राऊत यांचे फोटो लावत आपला राग व्यक्त केला.
युवासैनिकांच्या एक गटाने आक्रमक पवित्रा घेत परिसरतील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहात जात त्याठिकाणी राऊत यांचे फोटो लावले. आणि निषेध केला. तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊत यांच्याविषयी संताप व्यक्त करीत टीका केली आहे. थुंका तुम्ही, भुंका तुम्ही परिणाम पण भोगा तुम्ही, हीच तुमची कुवत, हीच तुमची वृत्ती, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा