Latest

Pune News : महसूल खाते सांभाळता येत नसेल, तर मंत्र्यानी राजीनामा द्यावा; पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक

अमृता चौगुले
पुणे; पुढारी वृत्तसेवा : नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात वारंवार मागण्या करूनही नोंदणी महानिरीक्षक व महसूलमंत्री हे नोंदणीसाठी येणार्‍या जनतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहेत. या ढिसाळ कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी नवीन शासकीय इमारतीसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांच्या फ्लेक्सचे दहन करून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो   कार्यकर्त्यांनी निदर्शने व घोषणाबाजी करीत नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनावणे यांच्या निलंबनाची मागणी केली. या वेळी मोहन जोशी व रवींद्र धंगेकर यांच्यासह रोहन सुरवसे पाटील, प्रथमेश आबनावे, चेतन अग्रवाल, प्रशांत सुरसे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नोंदणी व मुद्रांक विभागातील उपसचिव, सचिव कक्ष अधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, उपमहानिरिक्षक, सह जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक यांचे कामकाज सीसीटीव्हीअंतर्गत जनतेसाठी खुले करावे. नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडील '53 अ'खालील प्रकरणांची शासनामार्फत चौकशी करावी व यास जबाबदार असलेले विधी अधिकारी यांना त्वरित निलंबित करावे. वादग्रस्त उपनोंदणी महानिरीक्षक  उदयराज चव्हाण यांनी  ठाणे शहर येथील कार्यकाळात केलेल्या बेकायदेशीर कामांची चौकशी करावी. 'कलम 32'खाली शासनाचा महसूल बुडविणारे  छत्रपती संभाजीनगर  येथील उपनोंदणी महानिरीक्षक  विजय भालेराव  यांचीही चौकशी करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी नोंदणी विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात सातत्याने निवेदने दिली, पाठपुरावा केला. मात्र, महसूलमंत्र्यांनी यासंदर्भात कोणतीही दखल घेतली नाही तसेच भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई केली नाही. महसूल खाते व्यवस्थित सांभाळता येत नसेल, तर विखे पाटील यांनी त्वरित राजीनामा द्यावा.
– मोहन जोशी, 
माजी आमदार
पुणे शहर अंतर्गत बोगस एनए ऑर्डर, बोगस भोगवटा प्रमाणपत्रे या दस्तांच्या अनुषंगाने नोंदणीकृत दस्तांची
अँटिकरप्शनमार्फत चौकशी करून यात दोषी असणार्‍या दुय्यम निबंधक व सेवानिवृत्त सह जिल्हा निबंधक यांच्यावर कलम 81 खाली गुन्हे दाखल करावेत.
– रवींद्र धंगेकर, 
आमदार
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT