Latest

प्रॉपर्टी कार्ड, सात-बारातील नोंदी घरबसल्या करा ‘ट्रॅक’

अमृता चौगुले

पुणे : सात-बारा उतार्‍यावर काही फेरफार केली असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रिका) वर फेरफार नोंदवण्यासाठी अर्ज केला असेल आणि त्याचे काम रखडले असेल तर घरबसल्या या प्रकरणाचे 'ट्रॅकिंग' ऑनलाईन करता येणार आहे. याबरोबरच हे प्रकरण एखाद्या अधिकारी किंवा कर्मचार्‍याकडे प्रलंबित असल्यास ते सुद्धा ऑनलाईनच समजणार आहे. याबाबत तुम्ही संबंधितांना माहिती देखील विचारणा करू शकता. 'आपली चावडी' या भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर आता ही सोय उपलब्ध करून देण्यात
आली आहे.

सात-बारा उतारा किंवा मिळकत पत्रिकेत (प्रॉपर्टी कार्ड) नियमानुसार काही फेरफार केल्यानंतर सुधारित सातबारा किंवा मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आपल्याला मिळेपर्यंत या प्रकरणाची विविध अधिकारी तसेच कर्मचार्‍यांकडून सर्व पडताळणी केली जाते. एकदा फेरफार (बदल) केल्यानंतर ही कागदपत्रे किती दिवसांत मिळू शकतील याची माहिती सामान्य नागरिकांना मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊनच नागरिकांसाठी ही माहिती खुली केली आहे.

सात-बारा, प्रॉपर्टी कार्ड किंवा फेरफार वर दुरुस्ती करण्याची प्रक्रिया कोठपर्यंत आली आहे, याची माहिती ऑनलाईन मिळण्याचे सुविधा आहे. तसेच अर्जदाराला घरबसल्या आपल्या प्रकरणाचे ट्रॅकिंग करता येणार आहे. आपले प्रकरण नेमके कोणत्या टेबलवर किती दिवस रखडले याची माहिती सर्व सामान्य नगरिकांना मदत होणार आहे.

– निरंजन कुमार सुधांशू, आयुक्त, जमाबंदी, भूमी अभिलेख विभाग, पुणे

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT