Latest

प्रियांका चोप्रा सरोगसीने आई : सरोगसी आहे तरी काय आणि भारतात त्याचे कोणते नियम आहेत?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई झाली आहे. खुद्द प्रियांकाने तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याची पुष्टी केली. प्रियांका आणि निक जोनास सरोगसीद्वारे पालक झाले आहेत. २०१८ मध्येच दोघांचे लग्न झाले. सरोगसी तंत्राच्या मदतीने आई बनणारी प्रियांका एकमेव नाही. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरुख खान, आमिर खान, करण जोहर, एकता कपूर आणि तुषार कपूर यांसारखे अनेक स्टार सरोगसीच्या मदतीने पालक झाले आहेत. सरोगसी म्हणजे काय आणि भारतात त्याचे काय नियम आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

सरोगसी म्हणजे काय?

जेव्हा एखादे जोडपे मूल जन्माला घालण्यासाठी दुसऱ्या महिलेचा गर्भ भाड्याने घेते तेव्हा या प्रक्रियेला सरोगसी म्हणतात. म्हणजेच सरोगसीमध्ये स्त्री तिच्या किंवा दात्याच्या एग्जद्वारे दुसऱ्या जोडप्यासांठी गर्भवती होते. सरोगसीद्वारे मूल होण्यामागे अनेक कारणे आहेत. उदाहरणार्थ, जोडप्याला वैद्यकीय समस्या असल्यास, स्त्रीच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते किंवा गर्भधारणेमुळे कोणतीही समस्या उद्भवू शकते किंवा एखाद्या स्त्रीला स्वतःला मूल जन्माला घालण्यासा इच्छित नसल्यास. दुसऱ्याचे मूल आपल्या पोटात वाढवणारी स्त्री सरोगेट मदर म्हणतात.

सरोगसीसाठी, मुल होण्यासाठी इच्छा राखणारे जोडपे आणि सरोगेट आई यांच्यात करार केला जातो. या अंतर्गत, गर्भधारणेतून जन्मलेल्या मुलाचे कायदेशीर पालक म्हणजे सरोगसी करणारे जोडपं असते. सरोगेट आईला गर्भधारणेदरम्यान स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय गरजांसाठी पैसे दिले जातात जेणेकरून ती गर्भधारणेदरम्यान स्वतःची काळजी घेऊ शकेल.

सरोगसीचे दोन प्रकार

सरोगसीचे दोन प्रकार आहेत. पारंपारिक सरोगसी ज्यामध्ये वडिलांचे किंवा दात्याचे शुक्राणू सरोगेट आईच्या एग्जशी जुळवले जातात. या सरोगसीमध्ये सरोगेट मदर ही बायोलॉजिकल आई असते. आणि दुसरी गर्भधारणा सरोगसी ज्यामध्ये सरोगेट आईचा मुलाशी अनुवांशिक संबंध नसतो. म्हणजेच सरोगेट मदरचे एग्ज गरोदरपणसाठी वापरली जात नाही. यामध्ये सरोगेट मदर ही मुलाची बायोलॉजिकल आई नसते. ती फक्त मुलाला जन्म देते. यामध्ये वडिलांचे शुक्राणू आणि आईचे एग्ज एकत्रित करून किंवा दात्याचे शुक्राणू आणि एग्ज यांची टेस्ट ट्यूब केल्यानंतर सरोगेट आईच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जाते.

भारतातील सरोगसी नियम

भारतात सरोगसीचा गैरवापर रोखण्यासाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. आर्थिक अडचणींमुळे बहुतांश गरीब महिला सरोगेट माता झाल्या आहेत. व्यावसायिक सरोगसी या प्रकारावर आता सरकारने बंदी घातली आहे. २०१९ मध्येच व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सरोगसीचा पर्याय केवळ मदतीसाठी खुला राहिला आहे. व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्याबरोबरच, नवीन विधेयकाने अल्नारिस्टिक सरोगसीशी संबंधित नियम आणि कायदेही कडक केले आहेत.

या अंतर्गत परदेशी, एकल पालक, घटस्फोटित जोडपे, लिव्ह-इन पार्टनर आणि एलजीबीटी समुदायातील लोकांसाठी सरोगसीचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. सरोगसीसाठी, सरोगेट आईकडे वैद्यकीयदृष्ट्या फिट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, तरच ती सरोगेट माता बनू शकते. दुसरीकडे, सरोगसीचा अवलंब करणाऱ्या जोडप्यांकडे ते वंध्यत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असावे.

तथापि, सरोगसी नियमन विधेयक २०२० मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. यामध्ये कोणत्याही 'इच्छुक' महिलेला सरोगेट बनण्याची परवानगी होती.

कोरोनाच्या काळात सरोगसीची प्रकरणे वाढली

कोरोना महामारीनंतर गेल्या दोन वर्षांपासून मंदी आणि बेरोजगारीमुळे सरोगसी मातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. इतरांच्या घरी झाडू-मोपिंग, भांडी किंवा किरकोळ काम करणाऱ्या महिला किंवा कारखान्यात काम करणाऱ्या महिलांनी कमी वेळेत जास्त पैसे कमवण्यासाठी सरोगसीचा अवलंब केला आहे.

कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी आणि एखाद्याच्या शिक्षणाचा किंवा उपचाराचा खर्च उचलण्यासाठी तरुण वर्गातील महिलांना सरोगसीतून पैसे कमविण्याचा सोपा मार्ग दिसतो.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT