Latest

Prince Harry accuses Prince William : कॉलर पकडली, जमिनीवर आपटले; ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी- विल्यम यांच्यात जोरदार भांडण

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या राजघराण्याचे छोटे राजकुमार प्रिन्स हॅरी यांनी त्यांच्या 'स्पेअर' या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांचा भाऊ प्रिन्स विल्यम आणि त्यांच्यात भांडण झाल्याचे त्यांनी पुस्तकात सांगितले आहे. प्रिन्स हॅरी यांचे प्रिन्स विल्यमसोबत त्याची पत्नी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मर्केल यांच्यावरून मतभेद झाले होते. यानंतर विल्यम यांनी प्रिन्स हॅरी यांच्यावर हात उचलला होता, असा दावाही केला आहे. (Prince Harry accuses Prince William)

प्रिन्स हॅरी यांनी त्यांचा मोठा भाऊ विल्यम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ड्यूक ऑफ ससेक्स हा बहुमान धारण करणाऱ्या प्रिन्स हॅरी यांनी त्यांचे आत्मचरित्र स्पेअरमध्ये स्वत: आणि विल्यम यांच्यात भांडण झाल्याचा दावा केला आहे. प्रिन्स हॅरी यांचा दावा आहे की विल्यम यांनी त्यांची पत्नी मेघन मर्केल यांच्यावरुन झालेल्या वादात त्यांना धक्का दिला. हॅरी यांचे हे आत्मचरित्र १० जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे.

प्रिन्स हॅरी यांनी दावा केला आहे की, २०१९ मध्ये लंडन येथील घरी विल्यम यांच्यासोबत भांडण झाले. विल्यम पहिल्यांदा त्यांच्यावर ओरडला आणि त्यानंतर त्यांना धक्का दिला. या घटनेत त्याला दुखापत झाल्याचा हॅरी यांचा दावा आहे. मेघनवरून विल्यम आणि हॅरी यांच्यात मारामारी झाली. विल्यम यांनी हॅरी यांना सांगितले होते की त्याची पत्नी अतिशय वाईट वृत्तीची, विक्षिप्त आणि हट्टी आहे. विल्यम यांच्या या प्रतिक्रियेनंतर हॅरीसोबत त्यांचा जोरदार वाद झाला. हॅरी यांचा दावा आहे की, विल्यम ज्या गोष्टींवर मीडियामध्ये मेघनबद्दल बोलले जात होते त्याच गोष्टींवर विश्वास ठेवत होता.

यावरुन झालेल्या वादात विल्यम यांनी त्यांची कॉलर पकडली, त्याची चेन तोडली आणि त्याला जमिनीवर फेकले. जमिनीवर पडल्यामुळे दुखापत झाली. पाठीला अनेक ठिकाणी दुखापत झाली, असा दावा प्रिन्स हॅरी यांनी केला आहे. (Prince Harry accuses Prince William)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT