Latest

power against cancer : जेवणातील जीवाणूंमुळे होऊ शकते कर्करोगाविरुद्धची शक्ती कमजोर

Arun Patil

न्यूयॉर्क : जीवाणू हे सर्वत्र अस्तित्वात असतात, अगदी आपल्या जेवणातही. खाद्यपदार्थांमध्ये असलेले काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू माणसाच्या कर्करोगाविरुद्धच्या रोगप्रतिकारकशक्तीला (power against cancer) कमजोर करू शकतात, असे एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे.

काही जीवाणू हे आपल्या शरीराला कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी (power against cancer) मदत करतात तर काही ट्यूमर विकसित होण्यासाठी तसेच तो वाढण्यासाठी मदत करतात. आतड्यातील जीवाणू शरीरातील पेशींचा व्यवहार बदलून कर्करोगाची जोखीम वाढवू शकतात. काही सुरक्षित जीवाणू पेशींना सामान्य व्यवहार करण्यासाठीही प्रेरित करतात. मात्र, काही जीवाणू हे पेशींना कमजोर करतात आणि कर्करोगाचा धोका वाढवतात. प्रत्येक मानवी शरीर ही एक बहुपेशीय अशी 'सहकारी' रचना आहे. तीस हजार अब्ज पेशी एकमेकींना सहकार्य करीत व एकमेकींशी समन्वय ठेवत शरीर नामक यंत्र चालवत असतात.

त्यांच्या सामान्य व्यवहारात नियंत्रित पेशी विभाजन, पेशींचा नैसर्गिक मृत्यू, आवश्यक घटक एकमेकींना पुरवणे, श्रम विभाजन आणि बाह्य आवरणाची सुरक्षा आदींचा समावेश होतो. या यंत्रणेमुळे शरीराचे कार्य चांगल्याप्रकारे चालत असते. भाज्या, फळे, दही आणि भरड धान्यांमध्ये उच्च पोषक तत्त्वेही असतात आणि उपयुक्त जीवाणूही असतात. त्यांच्यामुळे कर्करोगाशी लढण्यास मदत होते. मात्र, अतिशय प्रक्रिया केलेल्या आणि मांसाहारावर आधारित आहारात हानिकारक सूक्ष्म जीव असू शकतात. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतील जिसेल मार्केज अल्कराज आणि अ‍ॅथेना एक्टिपिस यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT