Parineeti Chopra 
Latest

Parineeti Chopra : लग्नानंतर परिणीतीचा पहिला ख्रिसमस; जय्यत तयारी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) आणि तिचा पती राघव चढ्ढा लग्नानंतर पहिल्यांदा नवे कपल म्हणून प्रत्येक सणाचा आनंद घेत आहेत. या कपलने राजस्थान येथील उदयपूरमध्ये २४ सप्टेंबर २०२३ रोजी लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर परिणीती आणि राघव प्रत्येक सण आणि पार्टीला दणक्यात हजेरी लावत आहेत. दरम्यानच यावर्षीचा करवा चौथपासून ते दिवाळीपर्यतटे सण उत्साहात साजरे केले आहेत. आता हे कपल यंदाच्या ख्रिसमसच्या तयारीला लागले आहेत.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री परिणीती चोप्राने ( Parineeti Chopra ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर ख्रिसमसच्या निमित्ताने घरातील सजावट केलेले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ख्रिसमस टी, खाण्याच्या पदार्थ, लायटिंग, लव्ह आकाराचे हार्ट यासारखे अनेक गोष्टी तिने दाखवल्या आहेत. या वर्षीची थीम कृत्रिम बर्फासोबत सांताक्लॉज व्हिलेज थीम पार्क असणार आहे. यावरून यंदाचा ख्रिसमस परिणीती पती राघव चड्डासोबत मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याची माहिती मिळतेय. तर यासाठी आतापासूनच तयारीला सुरूवात झाली आहे. दरम्यान परिणीती लग्नानंतरची पहिली ख्रिसमस दणक्यात साजरी पार पडणार आहे.

गेल्या वर्षी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यानंतर दोघांनी १३ मे रोजी नवी दिल्लीत साखरपुडा केला. साखरपुड्यानंतर चार महिन्यांनंतर परिणीती आणि राघव यांनी 2२४ सप्टेंबर २०२३ रोजी राजस्थानच्या उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये पंजाबी पद्धतीने लग्न केलं. या शाही विवाहाला नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, क्रिकेटर हरभजन सिंग यांसारख्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, परिणीती अभिनेता अक्षय कुमारसोबत 'मिशन राणीगंज' मध्ये दिसली होती. यानंतर आता परिणीती लवकरच प्रसिद्ध पंजाबी गायक अमर सिंग चमकीला यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. परिणीती अमरजोत कौरची भूमिका साकारणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT