trisha krishnan- aishwarya 
Latest

Ponniyin Selvan : ‘पोन्नियिन सेल्वन’चा भव्य-दिव्य टीझर रिलीज, ऐश्वर्या रायच्या सौंदर्यपुढे ‘तिची’ स्पर्धा (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. मणिरत्नम यांच्या बहुप्रतिक्षित 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाला आहे. टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून चाहत्यांनाही तो चांगलाच आवडला आहे. चित्रपटाचा टीझर वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट मल्याळम, कन्नड, हिंदी आणि तमिळ भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये पाहता येणार आहे. विशेष म्हणजे हिंदी चित्रपटाचा टीझर अमिताभ बच्चन यांनी लॉन्च केला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर तिच्यासोबत साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णनदेखील या चित्रपटात दिसणार आहे. तृषा कृष्णन कुंदवईची राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे. (Ponniyin Selvan)

धमाकेदार टीझर

चित्रपटाचा टीझर खरोखरच छान आहे. टीझरची सुरुवातच मोठी जहाजे आणि एका साम्राज्याने होते. राजासमोर प्रजा नतमस्तक होते. टीझरमध्ये तृषा आणि ऐश्वर्याचा रॉयल लूकही दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये दोघी एका सीनमध्ये पण वेगळ्या स्टाईलमध्ये भेटतात. टीझर खरंच खूप छान आहे आणि टीझर पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की, तुम्ही खूप वर्षांनी परत आला आहात. हा चित्रपट दोन राजांच्या युद्धावर आधारित आहे.

टीझर रिलीज होण्याआधीच टीझर रिलीज सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. काही युजर्स सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दावा करत आहेत की हा पोनियिन सेल्वन या चित्रपटाचा टीझर आहे. याशिवाय ऐश्वर्याचा एक फोटोही समोर आला आहे जो लीक झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच एक छोटा व्हिडिओ व्हायरल झालाय. ऐश्वर्या राय आणि तृषा कृष्णन या दोघींचा हा व्हिडिओ असून दोघींची राणीच्या रुपातील झलक पाहायला मिळते. या दोघींच्या सौंदर्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील सर्व स्टार्सचे पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. नुकतेच या चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चन आणि तृशा कृष्णन यांचे पोस्टर समोर आले आहे. ज्यामध्ये दोन्ही अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहेत. या चित्रपटाद्वारे ऐश बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे.

तृषा कृष्णनच्या सौंदर्याची चर्चा

निर्मात्यांनी तमिळ चित्रपटातील तृषा कृष्णनचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. तिचा फर्स्ट लुक रिलीज करताना, अभिनेत्रीने स्वतः इन्स्टाग्रामवर लिहिले, 'पुरुषांच्या जगात, एक धैर्यवान महिला…कुंदवईच्या राजकुमारीला भेटा. Ponniyin Selvan ३० सप्टेंबर रोजी तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.

ऐश्वर्या डबल रोलमध्ये

Ponniyin Selvan मध्ये ऐश्वर्या राय बच्चन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मणिरत्नम दिग्दर्शित मल्टीस्टारर चित्रपटात विक्रम आणि कार्ती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच ऐश्वर्या राय बच्चनही या चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दुहेरी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती राणी नंदिनी आणि तिची मूकबधिर आई मंदाकिनी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि तृषा कृष्णन या दोघींचा रॉयल लूक पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT