पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : थेरगाव क्वीनसोबत धमकीचे आणि अश्लील शिव्यांचा व्हिडिओ बनवणाऱ्या कुणाल कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांचा खाक्या दाखवताच त्याने गयावया करण्यास सुरुवात केली.
तसेच, यापुढे अशी चूक करणार नसण्याचा माफीनामा कुणालने लिहून दिला. या गुन्ह्यातील तथाकथित थेरगाव क्वीन साक्षी श्रीमल आणि साक्षी कश्यप या दोघींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
साक्षी हेमंत श्रीश्रीमल (रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या 'थेरगाव क्विन'चे नाव आहे. तिच्यासह साक्षी कश्यप (रा. चिंचवड) हिला देखील अटक करण्यात आली आहे. तर, त्यांचा आणखी एक साथीदार कुणाल कांबळे (रा. गणेशपेठ, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साक्षी श्रीश्रीमल हिने इन्टाग्रामवर "थेरगाव क्विन' नावाने अकाऊंट तयार केले. तिने आणि इतर दोन आरोपींनी मिळून या अकाऊंटवर अश्लील भाषा वापरून धमकीचे व्हिडिओ पोस्ट केले. तसेच, हे व्हिडिओ व्हाॅटसॲपसह अन्य सोशल मीडियावर देखील व्हायरल केले.