पुढारी ऑनलाईन: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ- बद्रिनाथ दौऱ्यावर आहेत. आज केदारनाथ मंदिरात मोदी यांच्या हस्ते केदारनाथाची पूजा करण्यात आली. मोदींच्या दौऱ्यासाठी दोन्ही मंदिरांमध्ये जंगी तयारी करण्यात आली. यानिमित्त केदारनाथ मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या दौऱ्यामुळे या भागातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
केदारनाथाचे दर्शन आणि पूजेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येथील विकासकामांची पायाभरणी करण्यात आली. यावेळी मोदींच्या हस्ते रोपवेचे लोकार्पण करण्यात आले. ८ वर्षात पंतप्रधानांचा हा सहावा केदारनाथ-बद्रिनाथ दौरा आहे. यावेळी पंतप्रधानांनी 3 हजार 400 कोटीच्या प्रकल्पांची घोषणा केली. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मंदिराच्या परिसरात २०० मीटर पर्यंत बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.