Latest

PM Modi : पीएम मोदी यांची बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकमधील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला आज (दि. ९) ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  सहभागी होणार आहेत. वाघ वाचवण्यासाठी ५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रोजेक्ट टायगरच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तसेच मोदी देशातील वाघांच्या संख्येची आकडेवारीही आज जाहीर करणार आहेत.

दरम्यान, मोदी (PM Modi)  यांनी आज सकाळी भेट देऊन कार्यकर्त्यांशी व बचत गटांशी संवाद साधला. तसेच तामिळनाडूतील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प, थेप्पाकडू हत्ती कंपालाही त्यांनी भेट देऊन माहुत आणि कावड्यांशी संवाद झाला. यावेळी मोदी 'वाघ संवर्धनासाठी अमृत कालचे व्हिजन' जारी करतील आणि 'इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स' (IBCA) लाँच करणार आहेत.

बांदीपूर सफारीबाबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज सकाळी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आणि येथील दृश्यांचा आनंद घेतला. आजची सकाळ सुंदर बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात घालवली आणि भारताच्या वन्य जीवनाचा, नैसर्गिक सौंदर्याचा आणि विविधतेचा आनंद घेतला, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पीएम मोदींनी जंगल सफारीचा आनंद लुटला

पंतप्रधान मोदींनी रविवारी सकाळी कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा आनंद घेतला. व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवासाला एक तासापेक्षा जास्त वेळ लागल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान पंतप्रधानांनी अभयारण्यातील हत्तींच्या छावणीलाही भेट दिली.
मोदींनी व्याघ्र प्रकल्पाच्या फील्ड ऑपरेटरशी संवाद साधला, ज्यांनी व्यवस्थापन, परिणामकारकता आणि मूल्यमापनाच्या 5 व्या फेरीत सर्वाधिक गुण मिळवले. याशिवाय, ते इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स (IBCA) लाँच करणार आहेत. ज्याचा उद्देश वाघ, सिंह, बिबुट्या, स्नो लेपर्ड, प्यूमा, जग्वार आणि चित्ता या सात प्रमुख मांजरींच्या प्रजातींचे संवर्धन आणि संवर्धन करणे असा आहे.

पंतप्रधानांनी आघाडीच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची भेट घेतली

पंतप्रधान मोदींनी बांदीपूर रिझर्व्ह येथील फ्रंटलाइन फील्ड स्टाफची भेट घेतली. यानंतर पंतप्रधान संरक्षण कार्यात सहभागी असलेल्या बचत गटांशी संवाद साधणार आहेत. व्याघ्र प्रकल्प चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट तालुक्यात आणि अंशतः म्हैसूर जिल्ह्यातील एचडी कोटे आणि नांजनगुड तालुक्यात आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर म्हैसूरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने ६ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना बंदी घातली आहे. याशिवाय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 181 वरील वाहनांची वाहतूकही बंद केली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT