PM Modi Live From DU 1 
Latest

PM Modi Live From DU : ‘दिल्ली विद्यापीठ ही एक चळवळ’; दिल्ली विद्यापीठ शताब्दी समारोहातून PM मोदी लाइव्ह

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : "देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना दिल्ली विद्यापीठाने १०० वर्षे पूर्ण केली आहेत. दिल्ली विद्यापीठ हे केवळ एक विद्यापीठ नाही, तर एक चळवळ आहे. या विद्यापीठाने प्रत्येक चळवळ जगली आहे आणि प्रत्येक चळवळीला जिवंत केले आहे." अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विद्यापीठाबाबत कौतुगौद्गार काढले आहेत.

दिल्ली विश्वविद्यालयाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाले असून शताब्दी वर्षानिमित्त विश्वविद्यालयात खास समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारोहाची आज सांगता होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी विद्यापीठाकडून खास तयार करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी कॉम्प्युटर सेंटर आणि 'फॅकल्टी ऑफ टेक्नॉलॉजी' आणि दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक ब्लॉकची पायाभरणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "एक काळ होता जेव्हा दिल्ली विद्यापीठात फक्त 3 महाविद्यालये होती, आता त्यात 90 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. एक काळ असा होता की भारत नाजूक अर्थव्यवस्थांच्या यादीत येत होता आणि आज ती पहिल्या 5 जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये आहे. आज डीयूमध्ये शिकणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "20 व्या शतकाच्या तिसऱ्या दशकाने स्वातंत्र्य चळवळीला नवी गती दिली आणि या 21व्या शतकातील तिसरे दशक देशाच्या विकासाच्या प्रवासाला नवी गती देईल. गेल्या काही वर्षांत आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि एम्स महाविद्यालयांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. या संस्था नव्या भारताचे प्रमुख घटक बनत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "…भारतीय विद्यापीठांची जागतिक ओळख आज वाढत आहे. 2014 मध्ये QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत फक्त 12 भारतीय विद्यापीठे होती, ती आता 45 वर पोहोचली आहे. शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, आम्ही सतत काम करत आहोत. 2014 पूर्वी भारतात जवळपास 100 स्टार्टअप होते, आज ही संख्या 1 लाखांच्या पुढे गेली आहे.

महामारीच्या वेळी जगातील देश त्यांच्या गरजांसाठी संघर्ष करत होते. तथापि, भारत आपल्या गरजा पूर्ण करू शकला आणि इतर देशांनाही मदत करू शकला. त्यामुळे जगाला भारताबद्दल आणि त्याच्या संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता होती.

आपले विज्ञान जसे योग, आपली संस्कृती, आपले सण, आपले साहित्य, आपला इतिहास, आपला वारसा, आपले प्रकार, आपले पाककृती… आज सर्वांचीच चर्चा होत आहे, प्रत्येकासाठी एक नवीन आकर्षण निर्माण होत आहे. त्यामुळे त्या भारतीय तरुणांची मागणीही वाढत आहे जे विश्वाला भारताबाबत सांगू शकतील.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT